कोळे ता.सांगोला येथे चित्ररथाचे मोठ्या उत्साहात स्वागत
कोळे प्रतिनिधी:- (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागातील नागरिकांना भारत सरकारच्या योजनांची माहिती व्हावी. त्यांना त्याचा लाभ मिळावा. यासाठी केंद्र सरकारने 'विकसित भारत संकल्प यात्रा' सुरू केली आहे.
15 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधून या यात्रेला हिरवा कंदील देऊन सुरुवात केली. याचाच भाग म्हणून कोळे ता. सांगोला येथे या चित्ररथाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी कोळा गावचे ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खटकाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आयुष्मान भारत, पंतप्रधान आवास योजना, स्टार्टअप इंडिया, पंतप्रधान मुद्रा योजना,
सुकन्या समृद्धी योजना, पी एम किसान योजना, जन धन योजना, विश्वकर्मा योजना, उज्वला गॅस योजना यासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी चित्ररथाचे कोळा गावामध्ये स्वागत करत उपसरपंच डॉ. सादिक पटेल व खरेदी विक्री संघाचे संचालक महादेव सरगर यांच्या हस्ते चित्ररथाचे पूजन करण्यात आले.
या चित्ररथाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनाची माहिती, ग्रामपंचायत स्तरावरील शासनाच्या योजना, जल जीवन, हर घर नल, पशुधन, महिला बचत गट , आरोग्य विभाग,
कृषी विभाग तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचे विकसित भारत संकल्प रथातून व्हिडिओ चित्रफीत द्वारे माहिती देण्यात आली. यावेळी भाजपचे सांगोला विधान सभा संयोजक अमोल साखरे, सोलापूर जिल्हा युवा मोर्चा सचिव अमोल मोहिते,
बूथ प्रमुख निलेश मदने, युवक नेते हरिभाऊ सरगर, ग्रा.पं. सदस्य व ओबीसी सेल सांगोला तालुका अध्यक्ष शिवाजी आलदर, ग्रा.पं. सदस्य नामदेव आलदर , ग्रा.पं. सदस्य संदीपान आलदर, मा. पं. समिती सदस्य सिताराम सरगर,
आबा कोळेकर, महादेव पुजारी,तंटामुक्त समिती अध्यक्ष भारत इमडे दीपक आबा साळुंखे पाटील महाविद्यालयाचे एनसीसी कॅम्प चे मुले आणि मुली यांच्यासह कोळा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments