google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या बक्षिस वितरणास भाई जयंत पाटील उपस्थित राहणार

Breaking News

बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या बक्षिस वितरणास भाई जयंत पाटील उपस्थित राहणार

 बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणाऱ्या बैलगाडी शर्यतीच्या बक्षिस वितरणास भाई जयंत पाटील उपस्थित राहणार


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख‌ यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला येथे फॅबटेक सुतगीरणी जवळील भव्य पटांगणावरती खुल्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या खिलार जनावरांची संख्या कमी होताना दिसत आहे..आशा परिस्थिती मध्ये खिलार जनावरांच्या प्रजाती कायम टिकाव्यात या उद्देशाने या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.. 

बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील अनेक बैलगाडा सहभागी होणार आसुन ..सदर शर्यतीवरती सी.सी.टि.व्हि..च्या माध्यमातुन निरीक्षण केले‌ जाणार आहे.

 विजेत्यां प्रथम क्रमांकास आबासाहेब केसरी व रोख रुपये २५१०००/-रुपये दुसऱ्या क्रमांकास २०००००/-रुपये तिसऱ्या क्रमांकास १५००००/-रुपये ,

 चौथ्या क्रमांकास १०००००/-पाचवे क्रमांकास ७५०००/-रुपये , सहाव्या क्रमांकास ५००००/-‌रुपये तर सातव्या क्रमांकास २५०००/-रुपये अशी भरघोस बक्षीसे देण्यात येणार आहेत..

   सदर विजेत्यांना गुरुवार दिनांक १८/१/२०२४ रोजी दुपारी २-०० शर्यती स्थळी होणार असुन.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या शुभहस्ते व भाई राजेंद्रजी कोरडे व भाई एस.व्हि.जाधव सर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आसलेची माहीत प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Post a Comment

0 Comments