google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक !मंगळवेढा-सांगोला या राष्ट्रीय महामार्गावर लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर सोलापूर पोलिसांचा छापा; पिडीतेची सुटका, लॉज मालकावर गुन्हा दाखल

Breaking News

खळबळजनक !मंगळवेढा-सांगोला या राष्ट्रीय महामार्गावर लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर सोलापूर पोलिसांचा छापा; पिडीतेची सुटका, लॉज मालकावर गुन्हा दाखल

 खळबळजनक !मंगळवेढा-सांगोला या राष्ट्रीय महामार्गावर  लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर


सोलापूर पोलिसांचा छापा; पिडीतेची सुटका, लॉज मालकावर गुन्हा दाखल

मंगळवेढा-सांगोला या राष्ट्रीय महामार्गावर लेंडवे चिंचाळे हद्दीतील ज्ञानेश्वरी लॉजवर चालणाऱ्या वेश्या व्यवसाय ठिकाणी सोलापूर पोलिस अधिक्षक कार्यालयातील

 अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक पथकाने छापा टाकून एका पिडीतेची सुटका करून लॉज मालक अविनाश येडगे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, मंगळवेढा – सांगोला राष्ट्रीय महामार्गालगत लेंडवे चिंचाळे हद्दीत ज्ञानेश्वरी लॉजवर मालक तथा आरोपी अविनाश येडगे हा व्यवसायाकरीता महिला आणून

त्यांना वेश्या व्यवसाय करण्याकरीता भाग पाडत असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी 

वाहतुक प्रतिबंधक पथकाचे प्रमुख पोलिस निरिक्षक बजरंग साळुंखे यांना समजताच त्यांनी दुपारी २.२० वा. पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

सदर पथकाने एक बनावट ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाची खातरजमा करण्यात आली.

 यावेळी आरोपी हा बाहेरच्या राज्यातील महिला आणून वेश्या व्यवसाय करण्यास त्यांना भाग पाडत असल्याची माहिती स्पष्ट झाली.

यावेळी आरोपी हा प्रत्येक ग्राहकाकडून एक हजार रुपये घेवून पिडीतेस ५०० रुपये व स्वतःकडे ५०० रुपये ठेवत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

 सदर छापाप्रसंगी त्या दिवशी १३ ग्राहक केले असल्याचीही माहिती चौकशीत समोर आली आहे.

सदर पथकाने छापा प्रसंगी मोबाईल, रोख रक्कम, निरोध पाकिटे जप्त केली असल्याचे पोलिस उपनिरिक्षक रेवणसिध्द काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिस अधिक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाचे पोलिस निरिक्षक बजरंग साळुंखे,

महिला पोलिस निरिक्षक कुरी, महिला पोलिस उपनिरिक्षक प्रणोती यादव, महिला पोलिस शिपाई प्रिती पाटील, चालक पोलिस शिपाई रामनाथ बोंबीलवार,

 पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन वाकडे, सुर्यकांत जाधव, सहाय्यक फौजदार मंजुळा धोत्रे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान, सदर लॉजवरती चालणारा वेश्या व्यवसाय हा लक्ष्मी दहिवडी बीट अंतर्गत येत असून

 यापुर्वीही या लॉजवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई करून मुंबई येथील एका पिडीतेची या व्यवसायातून सुटका केली होती.

येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची गोपनीय माहिती ७५ कि.मी. अंतरावर असलेल्या पोलिस अधिक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध पथकाला समजते.

मात्र मंगळवेढा पोलिस व बीटचे पोलिस हवालदार यांना ही माहिती कशी काय समजत नाही? याबाबत सुज्ञ नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करीत 

जबाबदार बीटचे पोलिस हवालदारला तात्काळ निलंबीत करण्यात यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून पुढे येत आहे.

मंगळवेढा तालुका हा विविध संतांच्या पदस्पर्शाने पावन झाल्याने ही पवित्र भूमी समजली जाते.

 या पवित्र भूमीत वेश्या व्यवयास म्हणजे पाप समजले जात असून याचा सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

महिला वर्गातून या वेश्या व्यवसायाबाबत तीव्र निषेध व्यक्त करीत समाजहिताच्या दृष्टीने यापुढे वेश्या व्यवसाय आढळून आल्यास 

राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे महिलांनी महत्वकांक्षी निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments