धक्कादायक प्रकार...भर रस्त्यालगत केलेल्या अनाधिकृत बांधकामामुळे अपघाताचे प्रमाण वाढले ;
अनाधिकृत बांधकाम पाडण्यास न.पा.प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष !
सांगोला प्रतिनिधी ; शहरातील सनगर गल्ली येथील सिटी सर्वे नंबर २५२९ चे एकूण क्षेत्र ८७.७५ चौ.मी. असताना सदर मालमत्ता धारकांने सर्व नियम धाब्यावर बसवून
न.पा.प्रशासनातील कर्मचारी यांच्याशी हातमिळवणी करून अनाधिकृतपणे नियमापेक्षा जादा बांधकाम केले आहे.या अनाधिकृत केलेल्या बांधकामामुळे या ठिकाणी दररोज अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत.
या ठिकाणी अपघात होवुन अनेकजण जखमी झाले आहेत. हे अनाधिकृत केलेले बांधकाम तातडीने काढून टाकण्यात यावे या बाबत अनेक नागरिकांना न.पा.प्रशासनाला कळविले आहे.
मात्र न.पा.प्रशासन कागदी घोडे नाचवून नामा निराळे झाले आहे. न.पा.प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येते की, ज्या जागेवर रस्त्यालगत अनाधिकृत बांधकाम केले आहे. ती जागा महाराष्ट्र शासनाची आहे.
व या अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मा.तहसिलदार, सांगोला यांच्याकडे पत्र व्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आलं आहे.
मात्र न.पा.प्रशासन व तहसिलदार सांगोला यांच्या बेफिकीरीमुळे या ठिकाणी अपघात होवून एखाद्याचा मृत्यू झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार
असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.आज या ठिकाणी सनगरगल्ली कडून भिमनगरकडे जाणाऱ्या चारचाकी व
भिमनगर कडून सनगर गल्लीकडे जाणाऱ्या दुचाकीचा अपघात होवून दुचाकीवरील एक इसम जखमी झाला. या जखमी झालेल्या इसमाला या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार केले.
असे दररोज या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडत आहेत. तरी न.पा.चे मुख्याधिकारी व तहसिलदार साहेब यांनी या ठिकाणी केलेल्या अनाधिकृत बांधकामाला तातडीने भेट देवून अनाधिकृत केलेले बांधकाम त्वरीत पाडण्यात यावे.
0 Comments