google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज...खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

Breaking News

ब्रेकिंग न्यूज...खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन

 ब्रेकिंग न्यूज...खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन


खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. 

न्यूमोनिया झाल्याने काल (30 जानेवारी 2024 रोजी) दुपारी सांगलीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान बाबर यांचं निधन झालं.

अनिल बाबर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळख होती. शिवसेनामध्ये फूट पडल्यानंतरही अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. 

ते अगदी गुवहाटीलाही गेले होते. सांगलीच्या खानापूर मतदारसंघाचे अनिल बाबर प्रतिनिधित्व करत होते. 

अनिल बाबर यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पुरस्कृत सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. 

अनिल बाबर यांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिथून शिवसेना असा राजकीय प्रवास केला. कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांमध्ये ते मुख्यमंत्री शिंदेंशी एकनिष्ठ राहिले.

अनिल बाबर यांची ही आमदार म्हणून चौथी वेळ होती. 1990, 1999, 2014, 2019 ची आमदारकीची निवडणूक ते जिंकले. 

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले.

 टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो. गेल्यावर्षीच अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचं निधन झाले होते. 

पत्नीच्या निधनानंतर अवघ्या 6 महिन्यानंतर अनिल बाबर यांचंही निधन झालं. वर्षभराच्या आत बाबर कुटुंबातील महत्वाच्या 2 सदस्यांच्या निधनामुळे बाबर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

बाबर यांच्या निधनामुळे आज होणारी मंत्रीमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे हे बाबर यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आटपाडीला जाणार आहे. बाबर हे शिंदेंचे निकटवर्तीय मानले जायचे.

 सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आटपाडीला जाणार असून त्यांच्याबरोबर काही मंत्रीही उपस्थित असतील अशी माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments