धक्कादायक.. पतीचा आजार बरा करतो असे आमिष देत भोंदू बाबाचा आश्रमात महिलेवर बलात्कार.
अमरावती:-महिला अत्याचाराच्या घटना घडत असताना ज्याच्याकडे आपले संकट दूर करण्यासाठी अपक्षेने जाणाऱ्या महिला भोंदू बाबा चे शिकार होत आहे,
राज्यात भोंदू बाबांचे पेव फुटले असून नुकताच एक धक्कादायक घटना घडली असल्याचे समजतंय, पतीचा आजार बरा करतो
असे आमिष महिलेला दाखवून आश्रमात रहायला ये, पतीचा आजार बरा होईल असे सांगून अमरावतीत भोंदू बाबाने महिलेवर आश्रमात बलात्कार केला आहे.
या भोंदू बाबांचे नाव गुरुदास असून त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या बाबाने महिलेला पतीचा आजार बरा होण्यासाठी आश्रमात रहायला येण्यास सांगितले होते.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मार्डीच्या आश्रमात गुरुदास बाबाने त्याच्याकडे आलेल्या महिलेचं लैंगिक शोषण करून तिचा व्हिडीओ शूट केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीत केला आहे.
पतीचा आजार बरा होण्यासाठी या बाबाने पीडित महिलेला आश्रमात रहायला सांगितले होते. त्यावेळी महिलेचे लैंगिक शोषण केल्याची
व्हिडीओ व्हायरल झाल्यावर गुरुदास बाबाला अंनिसने आव्हान दिले होते. तसेच तिवसा तहसीलदार कार्यालयातून अशीही माहिती मिळाली होती की,
बाबाने सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून आश्रम उभारून भोंदुगिरी सुरू केली आहे. मोलमजुरी करून जीवन जगणारा सुनील गेल्या 15 वर्षांपासून स्वतःला गुरुदास बाबा म्हणवत आहे.
बलात्काराच्या घटनेने अमरावती जिल्हा हादरला असून भोंदू बाबावर गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलिस करत असल्याचे सांगण्यात आले.
0 Comments