google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 प्रा.दत्तात्रय काळेल यांना राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान

Breaking News

प्रा.दत्तात्रय काळेल यांना राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान

प्रा.दत्तात्रय काळेल यांना राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार प्रदान


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 सांगोला (प्रतिनिधी):  महाराष्ट्र राज्य सरकार मान्य मैत्री संस्था मुंबई यांच्या वतीने 2024 चा भारत सन्मान राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय

 पंढरपूर येथील राज्यशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दत्तात्रय मारुती काळेल यांना नुकताच प्राप्त झाला आहे.

 साईबाबा शिर्डी या ठिकाणी शिर्डी लोकसभेचे मा. खासदार भाऊसाहेब वाघचौरे व प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना विजया कदम व राज्यश्री काळे तसेच गाडगे महाराज ट्रस्ट मुंबईच्या संचालिका आणि समाजसेविका चारुशीला देशमुख तसेच प्रसिद्ध उद्योजिका

 संगीताताई गुरव व अनिताताई काळे व प्रसिद्ध नृत्य सम्राट डॉ. सागर नटराज तसेच संयोजक आरोग्य मित्र सुभाषराव गायकवाड व सुरज भोईर यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

डॉ. दत्तात्रय काळेल यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान याबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.

 डॉ. काळेल हे खिलारवाडी येथील सुपुत्र आहेत. या अगोदरही त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments