google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात खासगी व सहकारी दूध संस्थांच्या चेअरमनची बैठक संपन्न वाढीव दूध अनुदान प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

Breaking News

सांगोल्यात खासगी व सहकारी दूध संस्थांच्या चेअरमनची बैठक संपन्न वाढीव दूध अनुदान प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

सांगोल्यात खासगी व सहकारी दूध संस्थांच्या चेअरमनची बैठक संपन्न 


वाढीव दूध अनुदान प्रक्रियेतील जाचक अटी शिथिल करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार : मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील

(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोल्यात खासगी व सहकारी दूध संस्थांच्या चेअरमनची बैठक संपन्न 

सांगोला : तालुका प्रतिनिधी राज्य सरकारने नुकताच गायीच्या दुधाला प्रतीलिटर ५ रुपये शासकीय अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु हे अनुदान मिळवण्यासाठी अतिशय क्लिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. शासन निर्णयातील जाचक अटी आणि नियम शिथिल करण्यासाठी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस यांना भेटणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी भवन सांगोला येथे शनिवार दि १३ जानेवारी रोजी खासगी आणि सहकारी दूध संस्थांचे पदाधिकारी तसेच सबंधित विभागाचे अधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

 या बैठकीला राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तानाजी पाटील जिल्हा दूध संघाचे संचालक विजय येलपले, चंद्रकांत चौगुले, जालिंदर बाबर, धनंजय पवार,

 नवनाथ भोसले, दादासाहेब घाडगे, नारायण गावडे, आनंदा साळुंखे, दिलीप बंडगर, यांच्यासह सांगोला तालुक्यातील सर्व खासगी आणि सहकारी दूध संस्थांचे चेअरमन उपस्थित होते यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना माजी आमदार दिपकआबा म्हणाले,आधीच डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या त्यातच दुधाचे दर घसरले यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला होता 

ही बाब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व देवेंद्रजी फडणवीस यांच्या सर्वप्रथम मी निदर्शनास आणून दिली यानंतरच राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दुधाला वाढीव ५ रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. 

संपूर्ण राज्यातील दूध दरवाढीच्या विषयावर सांगोला तालुक्यातून आवाज उठवला आणि त्याचा संपूर्ण राज्याला फायदा झाला. सध्या दूध दरवाढी बाबत शेतकऱ्यांना जे ५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे 

त्यासाठी शासनाने अनेक जाचक अटी आणि नियमाची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी सर्वप्रथम जास्तीत जास्त जनावरांचे टॅगींग करणे गरजेचे आहे.

 सांगोला तालुक्यातील एकही दूध उत्पादक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार नाही याची दूध संस्थांचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी काळजी घ्यावी. शासन स्तरावरून जी काही मदत लागेल

 त्यासाठी आपण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करू असेही शेवटी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले. 

शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या थेट खात्यावर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जनावरांचे टॅगींग करणे यासह अन्य तांत्रिक बाबी आवश्यक आहे. 

संपूर्ण प्रशासन यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीला तयार आहे. शेतकरी आणि सर्व दूध उत्पादक संस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि जास्तीत जास्त या अनुदानाचा लाभ मिळवून घ्यावा 

असलम सय्यद 

तालुका पशुवैद्यकीय अधिकारी

Post a Comment

0 Comments