मोठी बातमी.. मंत्रिमंडळ विस्तारात शहाजी पाटील यांना संधी मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता,
त्यांनी तब्येतीची विचारपूस केली : आ.शहाजीबापु पाटील
सांगोला : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव सदस्य आ. शहाजी पाटील असलेले सांगोल्याचे आ. शहाजी पाटील यांची मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी
लागण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर आ. पाटील यांना थेटपणे संपर्क केला असता, त्यांनी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर देत
याविषयी मी आताच काही बोलू शकणार नाही, असे सांगितले. शिवसेनेतील फुटीप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे आ. पाटील हे एकमेव सदस्य होत.
'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, समदं ओक्केच...' या वाक्यामुळे राज्यभर आ. पाटील सुप्रसिद्ध झाले आहेत.
त्यांच्या या लोकप्रियतेचा विचार करत तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला सोलापूर जिल्ह्यात बळकटी आणण्यासाठी आ. पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळत असल्याची चर्चा आहे. दरम्यान,याविषयी
आ. पाटील यांना राज्यभरातील त्यांच्या सहकारी आमदारांकडून वारंवार फोन येत आहेत. परंतु, आपल्या खुमासदार वाणीने, विनोदी बोलण्याचे आ. पाटील त्या सर्व फोनवर मुख्य प्रश्नाला बगलदेत चर्चा करत आहेत.
सांगोल्यातील कोल्हापूर रस्त्यावर असणाऱ्या आ. पाटील यांचे कार्यालय सध्या मंत्रिपदाच्या चर्चेमुळे खूप गजबजून गेले आहे. शुक्रवारी आ. पाटील यांना सोलापूर शहर-जिल्ह्यासह राज्यातील !
अनेक लोकप्रतिनिधी, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे फोन येत होते. त्यास प्रत्येकाचा अदबीने स्वीकार करत आ. पाटील मात्र याविषयी 'मौनम् सर्वार्थ साधनम्' अशी भूमिका घेताना दिसून आले.
चौकट
माझे नुकतेच डोळ्याचे ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे मला गॉगल घातल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. अशात मुंबईत काहीतरी घडामोडी सुरू असल्याचे माझ्याही कानावर आले आहे. ते मंत्रिपदाचे काय ते आतापर्यंत मला काहीही माहीत नाही, पण मुख्यमंत्र्यांनी कालपरवा मला फोन करून माझ्या तब्येतीची चौकशी केली, इतकेच मी आता तुम्हालासांगतो.
- आ. शहाजी पाटील आमदार, सांगोला विधानसभा


0 Comments