मोठी बातमी...४० दिवसांपासून अंगणवाड्या बंदच, सांगोल्यात सेविकांचा निघाला मोर्चा
कर्मचाऱ्यांना नोटिसा एक हजार अंगणवाडी सेविका, मदतनिसांचा सहभाग
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला : मानधन नको, वेतन: हवे हम
सब एक है, हमारी युनियन हमारी ताकद है.. अशा घोषणा देत मागील ४० दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ
सांगोला यांच्या वतीने शुक्रवारी सांगोला शहरातील महात्मा फुले चौक येथून प्रमुख मार्गाने पंचायत समिती बालविकास प्रकल्प कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढला होता.
या मोर्चात सांगोला तालुक्यातील सुमारे १ हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या संपाला सोलापूर जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने पाठिंबा दिल्याचे
माजी सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी यांनी सांगितले. अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार रुपये, मदतनीस यांना २२ हजार रुपये भरघोस मानधन वाढ, ग्रॅच्युईटी तसेच सरकारने वेळोवेळी केलेल्या आश्वासनानुसार
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मानधनाच्या अर्ध्या मानधना एवढीदरमहा पेन्शन देण्यात यावी, केंद्र शासनाच्या आदेशानुसार सर्व मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करावे,
मुख्यमंत्री यांनी अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामाकरिता ऑक्टोबर महिन्यापर्यंत नवीन मोबाइल देण्याचे मान्य केले होते त्यानुसार ते देण्यात यावेत.
सेविकेमधून मुख्य सेविकेची पदोन्नती करणे, १० वी पास मदतनीसांना सेविका पदी थेट नियुक्ती देणे आदी विविध प्रलंबित मागण्यासाठी मागील ४० दिवसापासून अंगणवाडी
सेविकांचा बेमुदत संप सुरू आहे. संपामुळे ३ ते ६ वर्षे वयोगटातीलमुले शिक्षण व आहारापासून वंचित असून गरोदर स्कंदा, ६ महिने ३ वर्षे मुले
कुपोषित मुलेही आहारापासून वंचित असल्याने राज्य सरकारला संपाचे काहीच देणे-घेणे नसल्याचे यावरून दिसून येत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे.मोर्चाप्रसंगी रेखा सगरे,
संगीत वाघमारे, रेश्मा सरवदे, नागर होवाळ सुवर्णा दौंड, शोभा जाधव, रिजवान शेख, रेखा शिंदे, सजाबाई भोसले, मीन महिमकर, स्वाती वाघमोडे, पारुबाई धायगुडे, संजीवनी गडहिरे, सुनीत माळी आदी उपस्थित होत्या.
चौकट
संप मोडीत काढत असल्याचा आरोप
बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षक यांचेकडून संपकऱ्यांना तत्काळ शाळेवर हजर व्हावे म्हणून नोटीस काढल्या आहेत
यावरून सरकारकडून अंगणवाडी सेविकांचा संप मोडीत काढण्याचा प्रकार सुरु केल्याचे दिसून येत आहे. परंतु आम्ही मागण्यावर ठाम आहोत. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही,
तोपर्यंत एकही अंगणवाडी सेविका मदतनीस कामावर हजर राहणार नाही असा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड व तालुकाध्यक्षा शारदा वाघमारे यांनी दिला आहे.


0 Comments