खळबळजनक घटना.. मुलींसोबत सैतानी कृत्य! कपडे काढून लोखंडी चिमट्याने चटके उलटं टांगून लाल मिरचीची धुरी
अलीकडे देशातील विविध भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान मध्य प्रदेशातील इंदूर येथील अनाथ आश्रमातील मुलींनी तेथील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
येथे चार ते सोळा वर्षे वयोगटातील मुलींनी त्यांच्यासोबत घडलेली क्रूरता जेव्हा पोलिसांसमोर सांगितली, तेव्हा अधिकारीही चकित झाले.
या प्रकरणी तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अनाथ आश्रमातील चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या अनाथ आश्रमातील 21 मुलींनी कर्मचाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यांचे कपडे काढून लोखंडी चिमट्याने चटके दिले.
उलटं टांगून लाल मिरचीची धुरी दिली, असे मुलींनी तेथील कर्माचाऱ्यांविरूद्ध आरोप केले आहेत.
अलीकडे बाल कल्याण समितीच्या टीमने इंदूरमधील वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या अनाथ आश्रमाची अचानक तपासणी केली होती. यानंतर हा धक्कादायक खुलासा झाला.
0 Comments