पंढरपूर-दिघंची रोड वरती ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरला दुचाकीची धडक..
दिघंची माजी ग्रामपंचायत सदस्याचा अपघाती मृत्यू :
दिघंची ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश शिंदे यांचे अपघाती निधन झाले.
पंढरपूर-दिघंची रोड वरती ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला त्यांच्या दुचाकी धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. सदरची घटना
ही दिनांक २९ रोजी रात्री ८.३० च्या दरम्यान घडली. या दुर्देवी घटनेने दिघंची परीसरामधून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक अशी, प्रकाश श्रीरंग शिंदे (वय ३४) रा. दिघंची हे दुचाकी (MH10-EB-3017) वरून दिघंचीकडे येत होते. दादा रकमा चव्हाण रा. इटकी ता. सांगोला हे ऊस वाहतूक करणारा
ट्रक्टर (MH10-E-4733) घेवून पंढरपूर-दिघंची रोडवरती महादेव शिंदे यांच्या भवानी मळा येथील घराजवळ उभा केला होता.
यावेळी दिघंचीकडे प्रकाश शिंदे हे निघाले होते. परंतु त्यांना यावेळी रस्त्याच्या कडेला उभा असलेला
ऊस वाहतूक करणारा ट्रक्टर व ट्रॉलीला पाठीमागून धडक बसली. यामध्ये त्यांच्या मृत्यू झाला. याप्रकरणी दीपक शिंदे यांनी दिलेल्या
फिर्यादीनुसार आरोपी दादा रकमा चव्हाण याच्या विरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
0 Comments