google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी..सोलापूर विमानतळावर सांगोला कन्ये कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत

Breaking News

मोठी बातमी..सोलापूर विमानतळावर सांगोला कन्ये कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत

मोठी बातमी..सोलापूर विमानतळावर सांगोला कन्ये कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत


सांगोला- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सोलापुर दौर्यावर आले होते. या वेळी त्यानी जगातील सर्वात मोठ्या गृह प्रकल्पाचे लोकार्पण केले.

या वेळी त्यानी भव्य घरकुल हस्तांतरण सोहळ्यात पंधरा हजार लाभर्थी नागरिकाना चावी पदार्पण केले.प्रारंभी त्यांचे सोलापुर विमानतळावर आगमन झाले.

विमानतळावर स्वागत करण्याचा मान एका सांगोला कन्येस मिळाला हे विशेष आहे.सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मन्डळचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या कन्येस मोदीचे स्वागत करण्याचा मान प्राप्त झाला आहे.

पुर्वश्र्मीची प्रार्थना झपके या सध्याच्या सौ.प्रार्थना नितीन बिजरगी या सोलापुर स्थित असुन त्यानी सोलापुर विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.सन 1990 च्या सुमारास तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह सांगोला दौर्यावर आले

 असताना प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यानी सांगोलयचे नगराध्यक्ष या नात्याने त्यांचे सांगोला नगरी मध्ये स्वागत केले होते.याचे स्मरण या निमित्ताने झाले. प्रार्थना बिजरगी यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करताना

 त्यांच्याशी थोडक्यात  संवाद साधला.नरेंद्र मोदी यांचे सारखे कर्तबगार व दूरदृष्टी असणारे नेतृत्व भारतास लाभल्याचा तमाम भारतीयाना अभिमान वाटत असल्याची भावना त्यानी मोदी यांचे जवळ व्यक्त केली..

एकाच परिवारातील दोन व्यक्तीना व ते ही सांगोलयशी संबंधित असणार्या पिता- पुत्रीस पंतप्रधानाचे स्वागत करण्याचा बहुमान प्राप्त होत असल्याबद्दल ही सांगोल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments