google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या जर्शी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या ...

Breaking News

सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या जर्शी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या ...

 सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या जर्शी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या ...


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील एखतपूर येथील १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या जर्शी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या घरासमोरील मोकळ्या जागेत

 बांधलेल्या १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या जर्शी गायी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या असल्याची घटना

 एखतपूर ता. सांगोला येथे घडली. चोरीची फिर्याद हरी बाळासाहेब इंगोले यांनी दिली आहे.फिर्यादी इंगोले हे कुटुंबासह राहणेस असुन जर्शी गाय पाळून त्याच्या दुग्ध व्यवसायावर कुंटुबाचा उदरनिर्वाह करतात.

 दिनांक २८ जानेवारी २०२४ रोजी तीन जर्शी गाय व पहाडी घरासमोरील मोकळ्या जागेत सांयकाळी ६ वा चे सुमारास बांधून रात्री

 जेवण खान करून शेतामध्ये दारे धरण्यासाठी गेले होते. शेतातील दारे धरून मध्यरात्री १ वा. चे सुमारास घरी येवून झोपले. त्यावेळी घरासमोर बांधलेल्या जर्शी गाय होत्या,

 नंतर सकाळी ६ वा. चे सुमारास जाग आल्यावर उठून घराचे बाहेर येऊन पहिल्यानंतर घरासमोर बांधलेल्या जर्शी गाय पैकी दोन जर्सी गाय दिसून आल्या नाहीत. 

त्यावेळी आजूबाजूला शेतात, गावात, गावाच्या बाहेर शोध घेतला परंतु त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे खात्री झाल्याने दोन जर्शी गायी कोणीत्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments