सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना!
चेक बाउन्स केल्याप्रकरणी
एकाला ८ लाखांचा दंड, दंड न भरण्यास शिक्षा; न्यायालयाचे आदेश
हातउसने घेतलेल्या पैशाचा ६ लाख ५० हजार रुपयांचा चेक बाऊन्स केल्याप्रकरणी शेजबाभुळगाव येथील
एकाला ८ लाख रुपयांचा दंड मोहोळच्या फौजदार न्यायालयाने केला आहे.
याबाबत नेताजी बबन गवळी यांनी फिर्याद दिली होती. या प्रकरणी राजेंद्र महादेव म्हमाणे यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
शेजबाभुळगाव (ता. मोहोळ) येथील फिर्यादी नेताजी गवळी व राजेंद्र म्हमाणे यांचे ओळखीचे संबंध होते.
ओळखीच्या संबंधातून गवळी यांनी राजेंद्र म्हमाणे यास ६ लाख ५० हजार हातउसने दिलेले होते. २०१६ मध्ये गवळी यांनी म्हमाणे यांना पैसे दिले होते.
काही दिवसांसाठी दोघांत हा आर्थिक व्यवहार झाला होता. दरम्यान पैसे दिल्यानंतर काही दिवसानंतर गवळी यांनी पैसे मागितले. पण म्हमाणे यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.
खूपच पाठपुरावा केल्यानंतर म्हमाणे यांनी रक्कम रोख स्वरूपात परत न देता चेक दिलेला होता. २०१७ मध्ये चेक देण्यात आला. गवळी यांच्याकडून तो चेक गवळी यांनी बँकेत
भरल्यानंतर बाउन्स झाला म्हणून फिर्यादी गवळी यांनी मोहोळ येथील वर्ग एक यांचे न्यायालयात फिर्याद दाखल केलेली होती.
गेल्या सहा वर्षापासून या खटल्याची सुनावणी सुरू होती. खटल्याच्या शेवटच्या सुनावणीत मोहोळ न्यायालयाचे
मुख्य न्यायाधीश एस. डब्ल्यू. ठोंबरे यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेऊन म्हमाणे यास ८ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
तसेच दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीस सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.
या खटल्यात फिर्यादीतर्फे अॅड कैलास नाईक, अॅड. आकाश कापुरे, अॅड. शुभम मोटे, अॅड. अक्षय राऊत यांनी या काम पाहिले.
0 Comments