google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक प्रकार...वादामुळे पत्नी मुलांसह माहेरी; पती आणि सासू मुलांना भेटायला गेले, मित्रांच्या मदतीने मेव्हणा नको ते करुन बसला अन्…

Breaking News

धक्कादायक प्रकार...वादामुळे पत्नी मुलांसह माहेरी; पती आणि सासू मुलांना भेटायला गेले, मित्रांच्या मदतीने मेव्हणा नको ते करुन बसला अन्…

 धक्कादायक प्रकार...वादामुळे पत्नी मुलांसह माहेरी; पती आणि सासू मुलांना भेटायला गेले,


मित्रांच्या मदतीने मेव्हणा नको ते करुन बसला अन्…

आपल्या मुलीला आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या वडिलांना आणि आजीला बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. 

धक्कादायक म्हणजे सासरच्या मंडळींनी वयोवृद्ध आजीला बेदम मारहाण केली. 

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील पत्नी आणि पतीचे वाद सुरू आहेत. पत्नी आपल्या मुली आणि मुलासोबत आपल्या आई- वडिलांसोबत राहते. 

दोन दिवसांपूर्वी पती आपल्या मुली आणि मुलाला भेटण्यासाठी आपल्या सासुरवाडीत गेला होता. त्या ठिकाणी आधी त्याला आपल्या मुली आणि मुलाला भेटून दिले नाही.

 नंतर त्याच्या मेव्हण्याने आपल्या काही मित्रांना बोलून त्या ठिकाणी पतीला बेदम मारहाण केली. मग मध्यस्थी करायला गेलेल्या पतीच्या आईलादेखील महिलांनी आणि पुरुषांनी मारहाण केली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील टिळक नगर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करणाऱ्या 

तीन जणांवर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात टिळक नगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

मात्र या प्रकारे अमानुषपणे मारहाण करण्यात विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे. या मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या आजीवर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments