खळबळजनक घटना...पंढपूरमध्ये
अवैधरित्या वाळू उपसा करताना तरुणाचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू
राज्य सरकारने वाळूचे धोरण जाहीर केल्यानंतरही पंढरपूर तालुक्यात अवैधरीत्या वाळू उपसा करताना तरूण
मजुराचा वाळुच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालाया घटनेनंतर पुन्हा एकदा अवैधरित्या वाळू उपसा करणारे रॅकेट उघडकीस आले आहे.
आज पहाटे रामा अनिल धोत्रे (वय 20) या मजुराचा चिंचोली भोसे येथे वाळुच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला असून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
संपूर्ण पंढरपूर तालुक्यात अवैधरीत्या वाळू उपसा बंद असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात येत आहे. अशात तरुण मजुराचा झालेला
मृत्यूमुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. वाळू माफियांचे नेटवर्क कार्यरत असून त्याला नेमका कुणाचा वरदहस्त आहे याची चर्चा सुरू झाली आहे.
मृत्यूमुखी पडलेल्या रामा धोत्रे यांचा अवघ्या दीड महिन्यापुर्वी विवाह झाला होता. त्यामुळे त्याचा अकस्मात झालेला मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
शासनाचे वाळू धोरण काय?
महाराष्ट्र शासनाने आपले वाळू धोरण जाहीर केले आहे, यात आता ग्राहकांना वाळूखरेदीसाठी महाखनिज ॲप अथवा सेतू केंद्रात नोंदणी करून संबंधित डेपोधारकास आधार क्रमांक देणे बंधनकारक केले आहे.
त्याशिवाय वाळू मिळणार नाही, असे नव्या वाळूधोरणात स्पष्ट केले आहे. याशिवाय एका वेळेस एका कुटुंबास 50 मेट्रिक टनच वाळू मिळणार असून तीसुद्धा 15 दिवसांच्या आत उचलून नेणे बंधनकारक आहे.
तसे न केल्यास मुदतवाढीसाठी संबंधित तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागणार आहे. वाळूची तस्करी रोखण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
डेपोतून नागरिकांना वाळू घेऊन जाण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परिवहन विभागाच्या सल्ल्याने वाहनप्रकारनिहाय प्रतिकिलोमीटर वाहतुकीचा दर निश्चित करून,
ती माहिती त्यांच्या संकेतस्थळावर तसेच महाखनिज प्रणालीवर नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून द्यावी. तसेच, या दराने वाळू वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांची माहिती प्रसिद्ध करावी.
0 Comments