google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक बाब उजेडात... 8 महिला पोलिसांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला बलात्कार

Breaking News

खळबळजनक बाब उजेडात... 8 महिला पोलिसांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला बलात्कार

 खळबळजनक बाब उजेडात... 8 महिला पोलिसांवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला बलात्कार


मुंबई - राज्यात दरवर्षी असंख्य महिला अत्याचाराचे प्रकरण समोर येतात मात्र या अत्याचारापासून महिला पोलिसही सुरक्षित नाही, 

मुंबई पोलिसांच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या 8 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा वरीष्ठ अधिकाऱ्यांनी बलात्कार केला असल्याची खळबळजनक बाब उजेडात आली आहे.

मागील अनेक दिवसांपासून 8 महिला पोलीस 3 वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या वासनेला बळी पडत आहे, इतकेच नव्हे तर पीडित महिला गरोदर राहिल्याने त्यांचा गर्भपात सुद्धा करण्यात आला.

3 पोलीस अधिकाऱ्यांनी महिला पोलिसांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचा व्हिडीओ बनविला, त्यांनतर तो व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या महिला पोलिसांवर अनेक दिवसांपासून अत्याचार करण्यात आला.

या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करीत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या आशयाचे पत्र महिला पोलिसांनी थेट मुख्यमंत्री शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे.

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या अत्याचाराची बाब पीडित महिला पोलिसांनी तक्रार अर्जात आपल्यावर घडलेली आपबीती कथन केली आहे, त्या 3 वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे आता लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments