google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित अनोखा संकल्प "नोकरी आपल्या दारी" सांगोला येथे भव्य रोजगार महोत्सव आयोजित

Breaking News

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित अनोखा संकल्प "नोकरी आपल्या दारी" सांगोला येथे भव्य रोजगार महोत्सव आयोजित

 मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसा निम्मित


अनोखा संकल्प "नोकरी आपल्या दारी" सांगोला येथे भव्य रोजगार महोत्सव आयोजित

दुष्काळी परिस्थितीत शेतीतून उत्पन्न नाही, दुधाला दर नसल्याने पशुपालनही परवडत नाही. अशा परिस्थितीत सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. प्रत्येक कुटुंबातील किमान एका तरी तरुणाच्या हाताला काम असेल

 तरच अर्थव्यवस्था गतिशील होईल आणि शेतकरी कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चालेल असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.

मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या ७ जानेवारी रोजी असलेल्या वाढदिवसा निमित्त “नोकरी आपल्या दारी” हा संकल्प घेऊन रोजगार महोत्सवाचे नियोजन करण्यासाठी बैठक संपन्न झाली या बैठकीत दिपकआबा बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील युवकचे जिल्हाध्यक्ष अभिजित आव्हाड कार्याध्यक्ष अक्षय भांड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तानाजी काका पाटील डॉ पियुष साळुंखे पाटील, 

युवकचे तालुकाध्यक्ष अनिल नाना खटकाळे सतीश काशीद माजी नगराध्यक्ष चंदन होनराव माजी नगरसेवक सोमनाथ लोखंडे जुबेर मुजावर आदिंसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे बोलताना मा. आम. दिपकआबा म्हणाले, गेल्या ३ ते ४ वर्षात सिंचनाच्या योजना बऱ्यापैकी मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे सांगोला तालुक्यात पाणी दाखल झाले आहे परंतु, या काळात 

सांगोला तालुक्याचे वरदान असलेले डाळिंब मर, पिन होल बोरर, तेल्या यासारख्या रोगांनी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. अशावेळी स्वतःचा आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक कुटुंबे संघर्ष करत आहेत. 

शिक्षण घेऊन तरुणांच्या हाताला काम नाही अशा परिस्थितीत त्यांना काम मिळवून देण्यासाठी राज्यातील नाही तर देशातील नामवंत यशस्वी या संस्थेच्या माध्यमातून

 सांगोला येथे भव्य रोजगार महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये शिक्षण घेऊनही बेरोजगार असलेल्या तरुणांनी तसेच १० वी १२ वी शिकून कामासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांनी सहभागी व्हावे 

ज्यांचे शिक्षण पूर्ण आहे त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता पाहून तात्काळ नोकरी मिळेल तर ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही त्यांना प्रशिक्षण देऊन नोकरी मिळेल

 विशेष म्हणजे प्रशिक्षणाच्या काळातही त्यांना पगार दिला जाईल म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी या रोजगार महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील म्हणाले, सांगोला तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक आणि दैनंदिन क्षेत्रातील कोणताही

 प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील सदैव तत्पर असतात. मा. आम. दिपकआबांनी आपल्या जन्मदिनी म्हणजेच ७ जानेवारीला नोकरी महोत्सव आयोजित केला आहे. 

या नोकरी महोत्सवात सांगोला शहर आणि तालुक्यातील तरुणांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी उमेश पाटील यांनी केले. यावेळी ॲड महादेव कांबळे यांनी मार्गदर्शन केले तर संतोष पाटील यांनी आभार मानले 

ज्या तरुणांनी १० वी, १२ वी, पदवी, डिग्री किंवा डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले आहे त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळेल. ज्यांना नोकरी करायची आहे पण शिक्षण नाही अशांना आम्ही प्रशिक्षण देऊन नोकरी देऊ प्रशिक्षणार्थी कालावधीतही आम्ही 

अशा तरुणांना योग्य पगार देऊ आमच्याकडे १ हजारहून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत. आजवर आम्ही लाखाहून अधिक तरुणांच्या हाताला काम दिले आहे. 

नोकरी मिळवण्यासाठी कुणालाही एक रुपयासुद्धा खर्च करावा लागणार नाही. मा. आम. दिपकआबांच्या वाढदिवसानिम्मित आम्ही “नोकरी आपल्या दारी” घेऊन येणार आहोत त्याचा आपण लाभ घ्यावा ;

यशस्वी फाऊंडेशन,

Post a Comment

0 Comments