google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला येथे 27 डिसेंबर 2024 पासून गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी सोहळा....

Breaking News

सांगोला येथे 27 डिसेंबर 2024 पासून गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी सोहळा....

 सांगोला येथे 27 डिसेंबर 2024 पासून गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी सोहळा....


 श्री समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा 110 वा पुण्यतिथी महोत्सव श्रीराम मंदिर, सांगोला व ध्यान मंदिर, सांगोला येथे प्रतिवर्षीप्रमाणे मार्गशीष्य वद्य प्रतिपदा

 बुधवार दिनांक 27 डिसेंबर 2023 ते शनिवार दिनांक 6 जानेवारी 2024 या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन 

नामसाधना मंडळ सांगोला यांच्या वतीने करण्यात आले आहे या उत्सवामध्ये दि.03/01/2024ते दि.05/01/2024  रोजी सायंकाळी सहा वाजता ध्यानमंदिर 

सांगोला येथे पंढरपूर येथील ह.भ.प. डॉक्टर जयवंत महाराज बोधले यांचे "हरी मुखे म्हणा" या विषयावर तीन दिवस सुश्राव्य असे प्रवचन होणार आहे 

तसेच दि.27/12/23 ते 05/01/24रोजी सायंकाळी चार ते पाच या वेळेत महिलांचे भजन श्री राम मंदिर ,महादेव गल्ली येथे होणार आहे. मंगळवार दिनांक 2 1 2024 रोजी 

सायंकाळी 06 वाजता ध्यानमंदिर सांगोला येथे श्री दयानंद बनकर व त्यांचे सहकारी यांचा भजन संध्या हा भावगीत व भक्ती गीत अभंग ,गौळणी यांचा भारदार कार्यक्रम होणार आहे

        सकाळी सहा वाजता मंगलधून व काकडा श्रीराम मंदिर व ध्यान मंदिर,सांगोला व रोज सकाळी 6.30वाजता राम मंदिर येथे सामुदायिक जप व उपासना व

 5 जानेवारी 2024 रोजी सकाळची उपासना झाली की लगेच भिक्षा फेरी व दिनांक 27 12 2013 ते 5 जानेवारी 2024 रोजी या 

कालावधीमध्ये ध्यानमंदिर सांगोला येथे सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत 13 तास अखंड जप व शनिवार दि.06/01/2024 रोजी पहाटे 5 ते 06.30 या वेळेत

 श्रीमती शुभांगी कवठेकर यांचे पुण्यतिथीचे कीर्तन व श्री महाराजांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी होईल व नंतर महारांची पालखी व नगरप्रदिक्षणा शोभायात्रा निघेल. व त्यानंतर महाप्रसाद  ध्यान मंदिर,

 सांगोला येथे होईल तरी आपण या पुण्यतिथी महोत्सवास आपले कुटुंबीय व परिचित भक्त मंडळीसह सहभागी व्हावे असे आवाहन नाम साधना मंडळ, सांगोला यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments