साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), मुंबई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन
प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांचे सयुक्त विद्यमाने दिनांक २२/११/२०१३ रोजी मेळावा संपन्न
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादीग,
दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराही, मादगी व मादिगा या जातीतील समाज बांधवांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.
महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळपर्यंत व शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरिता योजनांचा प्रचार, प्रसार व जास्तीत जास्त
लोकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी जिल्हा सोलापुर व जिल्हा धाराशिव येथील मातंग व तत्सम जातीतील समाज बांधवासाठी दिनांक २२/११/२०२३ रोजी सकाळी ११.००
वा. स्थळ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृह, सात रस्ता, शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे,बीग बजार समोर, सोलापूर येथे मेळावा संपन्न झाला.
मेळाव्याची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन व महापुरुषांना अभिवादन करुन करण्यात आली, शाहीर नंदू पाटोळे व मंडळ, सोलापूर यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गाणे सादर करुन केली.
सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत श्री.एल.ए. क्षिरसागर, जिल्हा व्यवस्थापक, धाराशिव व श्री. आर. एच. चव्हाण, जिल्हा व्यवस्थापक, सोलापूर यांचेवतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष-मा. श्री. मनिष सांगळे व्यवस्थापकीय संचालक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म), मुंबई होते, तर कार्यक्रमाचे
प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री, श्री. उत्तम प्रकाश खंदारे व मा. श्री. अनिल रा. म्हस्के, महाव्यस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म),
मुंबई हे उपस्थित होते. तसेच मेळाव्यासाठी जिल्हा सोलापूर व धाराशिव येथील समाजबांध, सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रस्ताविक भाषण श्री.शि.ल. मांजरे, प्रादेशिक व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ
(म), पुणे यांनी करुन महामंडळाच्या योजनांची माहिती दिली. तदनंतर सामाजिक कार्यकर्ते श्री. सतिश कसबे, धाराशिव,
श्री. युवराज पवार, सोलापूर, श्री. सुनिल अवघडे, सोलापूर, श्री. विलास लोंढे, सोलापूर, श्रीमती प्रमिला झोंबाडे, सोलापूर,
श्री. लखन गायकवाड, सोलापूर, श्री. राजन घाडगे, सोलापूर यांनी आपले मनोगत व्यक्त करुन महामंडळातील योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी काही सुचना/विनंती करण्यात आली,
तसेच मनोगतामध्ये प्रामुख्याने जामिनदारांची अट शिथिल करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे.
तसेच महामंडळाचे लाभार्थी यशस्वी उद्योजक श्री. शंकर मोरे, धाराशिव व बालाजी खंदारे, सोलापूर यांची त्यांचे यशाबद्दल महामंडळाच्या योजनेबद्दल मनोगत व्यक्त केले,
माजी राज्यमंत्री मा. श्री. उत्तम प्रकाश खंदारे यांनी देखील त्यांचे भाषणामध्ये बन्यांच बाबीवर प्रकाश टाकून महामंडळाच्या कामकाजामध्ये काही बदल करण्याबाबत सुचना केलेल्या आहेत,
तसेच महामंडळाच्या कार्यात सदैव सोवत राहून महामंडळाच्या अडीअचणी, राजकीय बाजूने शासन दरबारी मांडणार असल्याची ग्वाही या प्रसंगी दिली.
प्रमुख पाहुणे मा. श्री. अनिल रा. म्हस्के, महाव्यस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म), मुंबई यांनी आपल्या भाषणामध्ये
महामंडळाच्या सुरु असलेल्या योजना, प्रस्तावित योजना, नव्याने सुरु करावयाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच या सर्व योजना मातंग समाज व तत्सम जातीतील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या प्रचार व प्रसार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याबाबत सांगण्यात आले,
महामंडळमार्फत पूर्वी राबविण्यात येत असलेलया साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजने मध्ये बदल करुन देण्यात येणाऱ्या
प्रोत्साहनपर रक्कमेत देखील मोठयाप्रमाणात वाढ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच एनाएसएफडीसी योजना व त्यासाठी आवश्यक असलेली
खंडहमीसाठी मिळणेसाठी व सर्व सुरु असलेल्या योजना व प्रस्तावित योजनां प्रभावी पणे सुरु राहण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरु असान्याबाबत माहिती दिली.
तसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मोठयाप्रमाणात घेण्याचे अहवान श्री. अनिल मास्के, महाव्यवस्थापक यांचेमार्फत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण मा. श्री. मनिष सांगळे, व्यवस्थापकीय संचालक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (म), मुंबई यांनी केले,
या भाषणामध्ये त्यांनी महामंडळाचा पदभार स्विकारल्यापासून केलेल्या कामाजाचा आढावा सादर केला, तसेच लाभार्थीनी योजनांचा लाभ घेण्यासाठी व्यवसाय निवड करताना,
नवीन व नाविन्य पूर्ण व्यवसाय निवडीचायत अत्यंत सुंदर मार्गदर्शन केले, तसेच महामंडळाच्या योजना व प्रस्तावित योजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच शासनाने महामंडळास ता. तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे उपलब्ध करुन दिलेल्या जमिन/जागेवर सुरु करण्यात येणाऱ्या
युपीएससी / एमपीएससी सेंटर च बहुउपयोगी प्रशिक्षण केंद्राबाबत उपस्थितांना मौल्यवान मार्गदर्शन केले. नसेच महामंडळामार्फत राबविण्यात येत
असलेल्या योजनांचा लाभ मोठयाप्रमाणात घेण्याचे अहवान श्री. मनिष सांगळे, व्यवस्थापकीय संचालक यांचेमार्फत करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री.एल.एल. क्षिरसागर, जिल्हा व्यवस्थापक, धाराशिव यांनी केले तर कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन श्री. भैरवनाथ कानडे, सहशिक्षक, चिकुंद्रा, ता. तुळजापूर यांनी करुन कार्यक्रमाची शोभा बाढविली. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, श्री. एल. ए. क्षिरसागर, जिल्हा व्यवस्थापक, धाराशिव, श्री.आर.एच. चव्हाण,
जिल्हा व्यवस्थापक, सोलापूर, श्री. प्रशांत तेलंग, लेखापाल, सोलापूर, श्री. नितीन कांबळे, लिपीक, सोलापूर व इतर कर्मचान्यांमार्फत मेहनत घेण्यात आली.


0 Comments