चिकमहूद ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी तुषार भोसले यांची निवड.आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते नूतन सरपंच
सौ.शोभा कदम व उपसरपंच तुषार भोसले व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार संपन्न
महूद/प्रतिनिधी( शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
चिकमहुद (ता.सांगोला) येथील ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदी सौ. शोभा सुरेश कदम यांची नुकतीच निवड झाली आहे.
तर उपसरपंच पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपसरपंचपदी तुषार नवनाथ भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चिकमहुद (ता.सांगोला) येथील ग्रामपंचायतीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीच्या लोकनियुक्त सरपंच पदी सौ.शोभा सुरेश कदम यांची निवड झाली आहे.
सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीची प्रक्रिया आज दिनांक 22 रोजी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संपन्न झाली.यावेळी उपसरपंच पदासाठी तुषार नवनाथ भोसले यांचा एकमेव
अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली. यावेळी प्रशासकीय अधिकारी एस.जे.नागटिळक, ग्रामविकास अधिकारी आत्माराम कोळी आदी उपस्थित होते.
यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य नितीन सातपुते,सुनिता हुबाले, रखमा पारसे, राजेंद्र भोसले,सविता जाधव,सुनिता चव्हाण,दीक्षा कदम,सोनाली सावंत,
दादासाहेब महारनवर,वंदना फडतरे ,तुषार भोसले,कुंडलिक जाधव,लक्ष्मी भोसले, मारुती पारसे उपस्थित होते.त्यांच्या या निवडीनंतर फटाक्याची आतिश बाजी करत
गुलालाची उधळण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी नूतन सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रवींद्र कदम,
सुरेश कदम,नवनाथ भोसले,प्रमोद हुबाले,विश्वनाथ फडतरे,संजय पाटील,बाळदादा भोसले,सर्जेराव कदम,रणजीत कदम, किशोर महारनवर,आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


0 Comments