google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...सांगोला शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष..

Breaking News

मोठी बातमी...सांगोला शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष..

 मोठी बातमी...सांगोला शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष..


सांगोला तालुका दुष्काळाने होरपळत असताना पाणी पुरवठा यंत्रणा मात्र सुंद असल्याचे दिसुन येत आहे. ऐन दिवाळीत सांगोला शहराला पाणी पुरवठा बंद होता.तदनंतर दोन-तीन दिवसाचे कालावधीनंतर पाणी पुरवठा सुरळीत झाला.

 पण आज मितीस सांगोला शहराला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन खांडेकरवस्ती तुकाराम देवाप्पा खांडेकर याचे वस्ती जवळ वाल लिकेज होवुन मोठी गळती सुरू आहे. 

लाखोलीटर पाणी वाया चालले आहे. खांडेकर यांचे राहते घरासमोर दारातून पाणी वाहत असलेने याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

दारातुन पाणी वाहत असलेने जनावरा खालुन, शेतात पाणी वाहत आहे. पाणी पुरवठा अधिकारी दोन-तीन दिवस झाले. पाहणी करुन जात आहेत.

 पण दुरूस्ती करण्याचे नाव घेत नसल्याचे परिसरातील शेतकरी वर्गानी सांगितले.सांगोला शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाईप लाईनला टाकळी ते बोहाळी दरम्यान तुकाराम देवाप्पा खांडेकर घराजवळ मोठं गळती लागली

 असुन गेली दोन दिवस झाले लाखो लीटर पाणी वाया जात आहे.या कडे पाणी पुरवठा विभागाचे दुर्लक्ष झाल्या दिसुन येत आहे.

Post a Comment

0 Comments