google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज.. सांगोला तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला खिंडार..! शहर व ग्रामीण मधील आजी माजी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा आर पी आय आठवले पक्षाला शेवटचा आणि कायमचा जय भिम..!

Breaking News

ब्रेकिंग न्यूज.. सांगोला तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला खिंडार..! शहर व ग्रामीण मधील आजी माजी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा आर पी आय आठवले पक्षाला शेवटचा आणि कायमचा जय भिम..!

ब्रेकिंग न्यूज.. सांगोला तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला खिंडार..!


शहर व ग्रामीण मधील आजी माजी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा  आर पी आय आठवले पक्षाला शेवटचा आणि कायमचा जय भिम..!

सांगोला / प्रतिनिधी :आज दि.01/11/2023 रोजी सांगोला शहरात तालुक्यातील सर्व आजी- माजी नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली. सदर बैठकीस तालुका शहर व ग्रामीण मधील बहुसंख्य माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

   सदर बैठकीत सर्व माजी पदाधिकारी/ कार्यकर्ते यांची मते जाणून घेतली व चर्चा करण्यात आली. सांगोला तालुक्यात आरपीआय आठवले गटाच्या तालुकाअध्यक्ष बद्दल तिव्र नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

 मनमानी कारभार,पक्षांतर्गत कुरघोड्या, कार्यकर्त्यांची मने दुखावणे, वैयक्तिक अधिकारावर गदा आणण्याचा तालुका अध्यक्ष  यांचा वारंवार होणारा प्रयत्न, अशा अनेक कारणांमुळे  

बहुसंख्या आजी - माजी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्यामुळे कंटाळून सर्वांनी नाईलाजास्तव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय सर्वांनुमते घेण्यात आला. तालुका बॉडीतील कार्याध्यक्ष, 

कोषाध्यक्ष, सरचिटणीस, माजी युवक जिल्हाध्यक्ष, माजी युवक तालुका अध्यक्ष,काही जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी अशा अनेक प्रमुख जबाबदाऱ्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी तालुकाध्यक्ष यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय अखेर आज घेतला.

सदरच्या बैठकीला पुढील प्रमाणे कार्यकर्ते उपस्थित होते. रामस्वरूप बापू बनसोडे , संजय गाडे, विनोद उबाळे,संजय करडे, धर्मराज भडंगे,वसंत होवाळ, बाबासाहेब सरतापे, प्रवीण सरतापे,सुरज होवाळ, दिपक होवाळ, स्वप्नील सावंत, 

समाधान होवाळ, रामा बनसोडे, प्रवीण भोरकडे ,अमित रणदिवे, महेश भंडारे,कालिदास मागाडे, विकास सावंत, सुरज सोहनी, सुशील उबाळे, अमोल कांबळे, सुरज उबाळे,अतिन काटे,केतन कसबे, सदानंद सोनवणे, 

पांडुरंग करडे, रमेश करडे, गणेश हातेकर, समाधान करडे, दत्ता जावीर, विक्रम करडे, अजित होवाळ, समाधान (बापू) होवाळ, सर्जेराव उबाळे, सिद्धार्थ उबाळे आदी  अनेक पदाधिकारी/ कार्यकर्ते उपस्थित होते.

 सदरची बैठक ही माजी युवक जिल्हाअध्यक्ष मा. रामस्वरूप (बापू)बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील निर्णय लवकरच घेऊ असे सांगून मा. विनोद उबाळे यांनी सर्वांचे आभार मानले व बैठकीचा समारोप केला.

Post a Comment

0 Comments