google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात सण,उत्सव हे हरित व पर्यावरण पूरक साजरे करुन फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी

Breaking News

सांगोला शहरात सण,उत्सव हे हरित व पर्यावरण पूरक साजरे करुन फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी

 सांगोला शहरात सण,उत्सव हे हरित व पर्यावरण पूरक साजरे करुन


फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी – मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी 

सांगोला : सांगोले नगरपरिषदेकडून महाराष्ट्र शासनाचे “माझी वसुंधरा अभियान-४.०” हे प्रभावीपणे राबविणेत येत असून सदर अभियानांतर्गत नागरिकांनी येणारे सर्व धर्मांचे सर्व सण व उत्सव हे हरित आणि पर्यावरण पूरक साजरे करावेत,

अशी अपेक्षा व्यक्त करुन ही दिपावली आनंदी,सुरक्षित व फटाक्यांचा वापर टाळून पर्यावरण पूरक साजरी करावी आणि फटाके मुक्त दिवाळी साजरी करावी,असे आवाहन सांगोले नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.सुधीर गवळी यांनी केले आहे.

यावेळी बोलताना मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी पुढे म्हणाले की, भारत सरकारच्या,अधिसूचना क्रमांक G.S.R. ६८२ (ई), दि.५-१०-१९९९ अन्वये १२५ डीबी (ए-१) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती,विक्री किंवा वापर

 करण्यास केंद्र शासनाने मनाई केली असून अशा फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे.तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाक्यांमध्ये बेरियम सॉल्ट,लिथीयम,अर्सेनिक,लीड,

मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात. हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांनाही घातक आहेत.तसेच जनहित याचिका क्र.१५२/२०१५ मध्ये 

मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाका विक्रेत्यांनी, विस्फोटक व अधिनियम १८८४ आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम २००८ मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

त्यामुळे,फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करु नये तसेच परवानगी असलेले फटाके हे नगरपरिषदेने निश्चीत केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करणे क्रमप्राप्त आहे,असेही मुख्याधिकारी डाॅ.सुधीर गवळी यांनी यावेळी सांगीतले.

Post a Comment

0 Comments