google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...शहाजीबापूंनी पुन्हा दंड थोपटले; ‘मला २०२४ मध्ये कोणाचेही आव्हान नाही’

Breaking News

मोठी बातमी...शहाजीबापूंनी पुन्हा दंड थोपटले; ‘मला २०२४ मध्ये कोणाचेही आव्हान नाही’

 मोठी बातमी...शहाजीबापूंनी पुन्हा दंड थोपटले; ‘मला २०२४ मध्ये कोणाचेही आव्हान नाही’


"संजय राऊत हे राजकारणातील साप गोळी '; संजय राऊतांच्या 'त्या' टीकेला शहाजीबापू यांचे प्रत्युत्तर

सांगोला:-सूतगिरणी, बाजार समिती, खरेदी विक्री संघ आणि परवा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आमदार पाटील यांना मात दिली आहे.

 सांगोला मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर काठावर निवडून आलेले आमदार शहाजी पाटील यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. 

आगामी विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत माझ्यासमोर कोणाचेही आव्हान नाही. मी हजारोंच्या मताधिक्याने २०२४ मध्ये पुन्हा आमदार होणार आहे, असा दावा आमदार शहाजी पाटील यांनी केला.

सांगोला मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमानंतर आमदार शहाजी पाटील हे माध्यमांशी बोलत होते. 

त्यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यापासून गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप याबाबत भाष्य केले.

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आपल्या खास गावराण ठसकेबाज भाषा शैलीसाठी ओळखले जातात. महाविकास आघाडीची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला शहाजीबापू गेले होते.

त्यावेळी काय झाडी.. काय डोंगर.. समद ओकेमध्ये आहे हा त्यांचा डायलॉग देशभर प्रसिद्ध झाला होता. तेव्हा पासून शहाजी बापू पाटील हे चांगेलच चर्चेत आले आहेत.

आमदार शहाजी पाटील यांनी २०१९ मध्ये सांगोला मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. 

त्या निवडणुकीत पाटील यांचा (स्व.) आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्याशी सामना झाला होता. त्या निवडणुकीत अवघ्या ७६८ मतांनी शहाजी पाटील हे निवडून आले होते. 

त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत देशमुख हे राजकारणापासून दूर राहत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र, गणपतआबांचे दुसरे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी शहाजीबापू पाटील यांच्याशी दोन हात केले आहेत.

सूतगिरणी, बाजार समिती, खरेदी विक्री संघ आणि परवा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आमदार पाटील यांना मात दिली आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीत डॉ. देशमुख यांनी आपला वरचष्मा राखला आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत देशमुख यांचे शहाजी पाटील यांना कडवे आव्हान असणार आहे. 

मात्र, आमदार पाटील यांनी आपल्याला कोणाचेही आव्हान नाही. विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत मीच पुन्हा आमदार होणार आहे, असा दावा करत विरोधकांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, शहाजी पाटील यांनी खासदार संजय राऊत यांचाही कडक शब्दांत समाचार घेतला. राऊत हे राजकारणातील सापगोळी आहेत. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर संजय राऊत यांना नागडा करून त्यांचे वस्त्रहरण केले आहे,

 अशी घणाघाती टीका शहाजी पाटील यांनी केली. शिंदे सेनेने राजकारणाचं वस्त्रहरण केले, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. त्याला आमदार पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

खासदार गजानन कीर्तिकर आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्यातील वैयक्तिक वादातून आरोप-प्रत्यारोप रंगले असावेत. शिवसेनेत कोणताही असंतोष नाही, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments