मराठा आरक्षण; एकदिवस कामकाज बंद करुन सांगोला बार असोसिएशनचा पाठिंबा
सांगोला (प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे):-सांगोला बार असोसिएशनच्यावतीने सांगोला न्यायालयातील सर्व विधीज्ञांनी एकदिवस कामकाजापासुन अलिप्त होत मराठा समाजास आरक्षण देणेस विलंबकेलेबाबत महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करुन मराठा
आरक्षण मागणीस पाठिंबा देण्यात आला. सदर ठरावास सुचक म्हणून अॅड. सचिन लक्ष्मण देशमुख यांनी तर अनुमोदन सांगोला विधीज्ञ संघातील
सदस्यांनी दिले.सांगोला विधीज्ञ स्टील से संघाची विशेष सभा दिनांक ०१ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता पार पडली होती. सध्या महाराष्ट्रात सकल मराठा समाजास आरक्षण मिळणेबाबत श्री. मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे.
परंतु राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे नाविलाजास्तव श्री. मनोज जरांगे-पाटील यांना उपोषणास बसावे लागले. सदर आरक्षणास संपुर्ण जाती धर्माचा पाठींबा आहे
व राज्यातील सर्व जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरून आरक्षणास पाठींबा देत आहेत. तरीही राज्य सरकारने आरक्षण देणेस लावलेल्या विलंबामुळे दळण वळण व जीवन ठप्प होत चालले आहे. बाजारपेठा बंद होत आहेत.
त्यामुळे सांगोला विधीज्ञ संघामध्ये याबाबत चर्चा होवुन मराठा समाजाला पाठींबा देणेचे एकमताने ठरले व त्यासाठी म्हणुन मंगळवार दि. १ नोव्हेंबर रोजी सांगोला न्यायालयातील सर्व विधीज्ञांनी एकदिवस कामकाजापासुन अलिप्त होणेचा निर्णय घेऊन सदर आरक्षण देणेस विलंब केलेबाबत महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध केला.
0 Comments