सकल मराठा समाज, जत शहर यांच्यावतीने साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस...
जत प्रतिनिधी: वार्ताहर:- (शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
मराठा आरक्षासाठी सखल मराठा समाजाकडून महाराष्ट्रात ठीक ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे. या साखळी उपोषणात जत तालुक्यातील मराठा समाजाकडून देखील या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस . माननीय श्री जरांगे पाटिल यांच्या समर्थनार्थ/ पाठिंब्यासाठी जोपर्यंत पुढील आदेश येणारं नाही तोपर्यंत उपोषण हे चालूच राहील. जत शहर व परिसरात आतापर्यंत रास्तारोको , गाव बंद , मशाल मोर्चा, व इतर मोर्चे हे सर्व आणि इतर ही आंदोलने केलेले आहे तरी अजूनसुद्धा शासनाला जर जाग येत नसेल तर आम्ही शासकीय कार्यालये बंद पाडू इच्छितो. जर सरकार या मराठा आरक्षणासाठी तातडीने अंमलबजावणी/ निर्णय घेणार नसेल तर येत्या काळात शासकीय कार्यालये सामोरं हे साखळी उपोषण सुरू केले जाईल. मराठा समाज हा अजुन देखील शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहे. तरी शासनाने तातडीने या मराठा आरक्षनाचा च्या मुद्यावर चर्चा करावी व लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा हे साखळी उपोषण असेच सुरु राहील...
0 Comments