सांगोला तालुक्यातील पाचेगांव खुर्द मध्ये जिजाऊंच्या
रणरागिणी उतरल्या रणांगणात सरपंच संगीता भोसले यांचं आमरण उपोषण
पाचेगांव (प्रशांत मिसाळ शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे):- मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार साखळी उपोषणाला गावागावातील सर्वसामान्य मराठा समाज शांततेत आमरण बसलेला आहे.
पाचगांव खुर्द येथे शनिवार दि. २८ पासून आमरण साखळी उपोषण सुरू असून काल बुधवार दि १ नोव्हेंबर रोजी पाचेगांव खुर्द येथील
जिजाऊंच्या रणरागिणी आंदोलनाच्यारणांगणात उतरल्या असून मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीनिशी उभा असल्याचे सांगितले. यावेळी पाचेगांव खुर्दच्या
• प्रथम नागरिक संगीता भोसले, सुजाताभोसले, पद्मिनी भोसले, सोनाली भोसले, राधिका मिसाळ, अनुजा भोसले, शीतल मिसाळ व ललिता मिसाळ यांनी आमरण साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
पाचदिवसापासून गावात साखळी पद्धतीने आमरण उपोषण चालू असून काल पाचव्या दिवशी जयसिंगतात्या पाटील यांनी जल व अन्नत्याग करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला.
चौकट
सत्ताधाऱ्यांच्या मुलांना साधा ताप आला तर यांना झोप लागत नाही पण एक शेतकऱ्याचा मुलगा गेली आठ दिवस अन्न पाण्याविना तिथं पडून आहे तरी या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला याची जाणीव नाही.
त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही मतदानाच्या स्वरूपात त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
-जयसिंगतात्या पाटील, पाचेगांव खुर्द
0 Comments