google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी...विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनरांगेत यंदा प्रथमच भाविकांच्या आरामाची व्यवस्था; 4 वर्षानंतर जनावरांचा बाजार भरणार, जिल्हाधिकाऱ्यांचे अनेक धाडसी निर्णय

Breaking News

मोठी बातमी...विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनरांगेत यंदा प्रथमच भाविकांच्या आरामाची व्यवस्था; 4 वर्षानंतर जनावरांचा बाजार भरणार, जिल्हाधिकाऱ्यांचे अनेक धाडसी निर्णय

 मोठी बातमी...विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनरांगेत यंदा प्रथमच भाविकांच्या आरामाची व्यवस्था;


4 वर्षानंतर जनावरांचा बाजार भरणार, जिल्हाधिकाऱ्यांचे अनेक धाडसी निर्णय

पंढरपूर:-यंदा कार्तिकी यात्रेच्या  शासकीय महापूजेस कोणाला पाठवावे याबाबत शासन पेचात सापडले असताना सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन सुलभ होण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत.

 यंदा प्रथमच कार्तिकी सोहळ्यामध्ये विठ्ठलाच्या दर्शन रांगेतील भाविकांना थकवा जाणवल्यास चार ठिकाणी आरामाची सुविधा निर्माण केली जाणार आहे.

 तासन्तास दर्शन रांगेत उभारणाऱ्या भाविकांना आराम मिळावा, त्यांची बैठक व्यवस्था आणि त्यांना इतर गरजेनुसार वैद्यकीय सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी दर्शन रांगेत चार ठिकाणी हि स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी कार्तिकी यात्रा नियोजनाचा आढावा घेतला. दर्शन रांगेमधील घुसखोरी थांबवण्यासाठी बॅरिगेटिंगमधील अंतर कमी करणे, ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, पोलीस सुरक्षित वाढ करणं, असे निर्णय घेताना

 वर्षानुवर्ष दर्शन रांगेत होत असणाऱ्या घुसखोरीवर पायबंद घालण्याची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना चंद्रभागेचे पवित्र स्नान करण्यासाठी आता 14 किंवा 15 नोव्हेंबर रोजी उजनी धरणातून चंद्रभागेत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेल्या चार वर्षापासून बंद असलेला जनावराचा बाजार यंदा वाखरीच्या पालखीतळावर पुन्हा एकदा सुरू होणार आहे. लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांची वैद्यकीय तपासणी करूनच आवश्यक पद्धतीने जनावरांचा बाजार भरला जाणार आहे. सध्या राज्यात ज्या भागात लंम्पि आहे

 त्या भागातील जनावरे आली तर त्यांची तपासणी करून लक्षणे आढळल्यास त्यांची वेगळी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments