खळबळजनक घटना...! सोलापुरात जातीचा बनावट दाखला तयार करून नोकरी मिळवली;
पत्नीच्या तक्रारीनंतर पतीला 3 वर्षे कारावास
मुस्लिम कोया या जातीचा बनावट दाखला तयार करून एसटी महामंडळात नोकरी मिळवल्या प्रकरणी खतालसाब महमद कासीम दंडू यास तीन वर्षे कारावासाची शिक्षा
आणि १ हजार रुपयांचा दंड न्याय दंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी सुनावला. बनावट दाखल्याच्या आधारे एसटी महामंडळात १९८२ मध्ये नोकरी मिळवली होती. यामध्ये एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले.
आरोपीची पत्नी शकिला दंडू यांनी केलेल्या तक्रारीवरून हा खटला दाखल झाला होता. शकिला दंडू यांनी सोलापूरच्या सदर बझार पोलिसांत तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने
राज्य परिवहन महामंडळाने जात पडताळणी समिती मार्फत चौकशी केल्यानंतर दाखला बनावट असल्याचे निष्पन्न झाले. २७ मे २००८ रोजी पोलिसांनी फिर्याद दाखल केली.
तपास अधिकारी अनिल नलावडे यांनी आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आरोपीच्या पत्नीसह सरकारी पक्षातर्फे जात पडताळणी अहवाल आणि ८ साक्षीदारांच्या साक्षी झाल्या.
आरोपीने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कोया जातीचा दाखला प्राप्त केल्याचे सिद्ध झाल्यामुळे आरोपीस तीन वर्षे कारावासाची शिक्षा आणि १००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
0 Comments