google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक ...सरपंच होण्यासाठी काळ्या बाहुल्यांचा वापर ! मतदारांत मोठी खळबळ ...

Breaking News

धक्कादायक ...सरपंच होण्यासाठी काळ्या बाहुल्यांचा वापर ! मतदारांत मोठी खळबळ ...

धक्कादायक ...सरपंच होण्यासाठी काळ्या बाहुल्यांचा वापर ! मतदारांत मोठी खळबळ ...


 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुन्हा एकदा जादू टोण्याचा वापर करण्यात येवू लागला असून कुणी काळ्या बाहुल्यांची पूजा केली आहे तर दुसऱ्या गटाने काळ्या बाहुल्या जाळल्या आहेत, असा प्रकार उघडकीस आला आहे. 

विज्ञानयुगाच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरीही अजून अंधश्रद्धेचा पगडा थांबताना दिसत नाही. भूतबाधा, जादूटोणा, करणी, भानामती अशा थोतांड गोष्टीवर या युगातही अनेकांचा विश्वास आहे.

 अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेचे डोळे उघडण्यासाठी घालवले आणि त्यांच्या आयुष्याचा शेवट देखील त्यातूनच झाला.

 तरीही आंधळ्या श्रद्धेला जपणाऱ्या लोकांचे डोळे अजूनही उघडलेले नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव ठरू लागले आहे.

 आजही अनेकांचा अशा अंध झालेल्या श्रद्धेवर विश्वास असून, ग्रामीण भागात सर्रास विश्वास ठेवला जातो. त्यासाठी अनेक अनुचित बाबी केल्या जातात. त्यामुळेच ढोंगी तांत्रिक मांत्रिकांचे फावले आहे. 

यातूनच निवडणूक जिंकण्यासाठी देखील या लंगड्या बाबीचा आधार घेतला जातो. सगळीकडेच असे प्रकार घडत असतात पण, सांगली जिल्हा मात्र याबाबत कायम आघाडीवर आहे.

मागील निवडणुकीच्या वेळी देखील सांगली जिल्ह्यात अशी प्रकरणे समोर आलेली आहेत.  रस्त्यावर लिंबू मिरच्या आणि काळ्या बाहुल्या या आधीही दिसून आलेल्या आहेत. 

आता पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ही कथित काळी जादू पुन्हा प्रभावाने समोर येवू लागली आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत, कुणी पैशाची जादू करीत आहे तर कुणी पार्ट्या देवून विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. 

अलीकडे निवडणूक जिंकण्याचे हेच अस्त्र प्रभावी झालेले आहे. सांगली जिल्ह्यात मात्र सर्रास जादूटोणा वापरण्याचा फंडा दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यातील हरिपूर ग्रामपंचायतीची निवडणूक सुरु असताना हा प्रकार पुन्हा समोर आला आहे.

 कुणीतरी काळ्या बाहुल्यांची पूजा केली आहे तर कुणी या काळ्या बाहुल्या जाळल्या आहेत. मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी त्या बाहुल्या जाळून टाकल्या आहेत. 

कुणीतरी या काळ्या बाहुल्यांची पूजा केल्याचे समोर आल्यानंतर हरिपूर येथे संतापाचे पडसाद उमटले आणि मोहिते पॅनलच्या कार्यकर्त्यांनी जादूटोणा केलेल्या बाहुल्या जाळून निषेध केला. 

या ग्रामपंचायतीवर तांबवेकर प्रणित बोंद्रे पॅनेलची सत्ता होती. सत्ताधारी गटाची सत्ता उलथवून लावण्यासाठी मोहिते पॅनल रिंगणात आहे. निवडणूक म्हटले की,

 आरोप प्रत्यारोप होत असतातच परंतु हरिपूर येथे काळ्या बाहुलीने सगळ्यांचे लक्ष  वेधले आहे. या  गावात एका घराच्या बाहेरच्या बाजूला काळ्या बाहुल्याचे पूजन करून ठेवण्यात आले असल्याचे दिसून आले आणि अनेकांना धक्का बसला. 

या बाहुल्या पाहून गावात एकच खळबळ उडाली. निवडणुकीत विजय मिळावा म्हणून कुणीतरी हा आंधळा प्रकार केला असल्याची चर्चा सुरु झाली आणि निवडणुकीच्या विजयासाठी काहींनी हा प्रकार केल्याचा आरोप मोहिते पॅनलकडून करण्यात आला. 

मोहिते पॅनलकडून मात्र या काळ्या बाहुल्या जाळून टाकण्यात आल्या आणि अशा प्रकारचा निषेध देखील करण्यात आला. 

त्यामुळे या बाहुल्यांचा खेळ कुणी केला याबाबत लोकांनी अंदाज बांधले. आता या काळ्या बाहुल्याच कदाचित एका गटाचा पराभव करण्यास कारणीभूत ठरतील.

 विज्ञान युगात अशा बाबींना थारा तर नाहीच पण, अशा प्रकारे निवडणूक जिंकण्याच्या इराद्याचा देखील निषेध केला जात आहे. सत्तारूद्ध असलेल्या गटाकडून हे बाहुल्यांचा खेळ केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments