नगरपरिषद सांगोला व वेदांत मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने
बचत गटातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
सांगोला- दि.अं.यो.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) ही केंद्र पुरस्कृत योजना सांगोला नगरपरिषद राबवित आहे.
सदर योजना ही शहरी दारिद्र्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सन २०१४-१५ पासून कार्यान्वीत झालेली आहे. योजनेच्या माध्यमातून शहरातील दारिद्र्य रेषेखालील महिलांचे जीवनमान
उंचविण्याच्या दृष्टीने नगपरिषदस्तरावर महिला बचत गटांची स्थापना करण्यात येते. या अनुषंगाने शहरामध्ये आज २०० पेक्षा जास्त बचत गट कार्यरत आहेत. या योजनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येते.
बचत गटातील महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोमवार दि. ०6 नोव्हेंबर २०२३ रोजी बचत गटातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नगरपरिषद सांगोला व वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात येणार आहे.
सदर शिबिरामध्ये महिलांची मोफत अरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये महिलांची बी.पी., शुगर, हाडांच्या ठिसूळपणा तपासणी व सी.बी.सी इ. तपासण्या होणार आहेत.
सदर अरोग्य शिबिराचे आयोजन हे हॉटेल जयनीला येथे होणार असून या शिबिराचा लाभ बचत गटातील जास्तीत जास्त महिलांनी घ्यावा. असे अवाहन डॉ.सुधीर गवळी, मुख्याधिकारी तथा प्रशासक, नगरपरिषद सांगोला यांनी केले आहे.
0 Comments