google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आटपाडी पोलिसांना आव्हान देत, सोनारसिद्ध मंदिरात धाडसी चोरी ; १५ किलो चांदी व १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास

Breaking News

आटपाडी पोलिसांना आव्हान देत, सोनारसिद्ध मंदिरात धाडसी चोरी ; १५ किलो चांदी व १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास

आटपाडी पोलिसांना आव्हान देत, सोनारसिद्ध मंदिरात धाडसी चोरी ; १५ किलो चांदी व १२ तोळे सोन्याचे दागिने लंपास


आटपाडी : आटपाडी पोलिसांना आव्हान देत, चोरट्यांनी सोनारसिद्ध मंदिरात धाडसी चोरी करत दरोडा टाकला. 

यामध्ये चोरट्यांनी १५ किलो चांदी व 12 तोळे सोन्याचे दागिने लुटले. या धाडसी चोरीमुळे आटपाडी पोलिसांच्या पुढे चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी येथे सोनारसिद्ध देवाचे मंदिर आहे.

 या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करत १५ किलो चांदी व 12 तोळे सोन्याचे दागिने अशी सात लाख रुपयांचे दागिने चोरून नेले.

 सदरची घटना ही आज पहाटेच्या सुमारास उजेडात आली. या घटनेची नोंद आटपाडी पोलिसात झाली असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments