Breaking News

निधन वार्ता ...सांगोला शहरातील बाळासाहेब मदने यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन !

निधन वार्ता ...सांगोला शहरातील बाळासाहेब मदने


यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन !

सांगोला तालुका प्रतिनिधी ; माजी नगराध्यक्ष कै.लक्ष्मण सदाशिव मदने(सर)यांचे धाकटे बंधू व ॲड.दिपक मदने यांचे वडिल कै. बाळासाहेब सदाशिव मदने यांचे

 वयाच्या ५५ व्या वर्षी शनिवारी दि. २१/१०/२०२३ रोजी मध्यरात्री १२. ४५ च्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

 शनिवारी सकाळी ९.०० सुमारास सांगोला येथील  स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.

 त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, बहिण भाऊ असा मोठा परिवार आहे.त्यांच्या तिस-या दिवसाचा विधी सोमवार दि.२३ /१०/ २०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता सांगोला शहरातील वाढेगाव रोड येथील स्मशानभूमीत होणार असल्याचे  त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments