ब्रेकिंग न्यूज..शिंदे गट आमदार अपात्रतेच्या सुनावणीचे वेळापत्रक ठरले
शिंदे गट आमदार अपात्र प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असून सर्व याचिकांवरील सुनावण्यात एकत्रित घ्यायच्या की नाही,
याबाबत 20 ऑक्टोबरला मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आमदार अपात्रतेची सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याची माहिती विधीमंडळातील सूत्रांनी दिली.
अलीकडे सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी आमदार अपात्रतेची सुनावणी घेतली होती. यावेळी ठाकरे गटाच्यावतीने सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या, अशी मागणी करण्यात आली.
तर आमदारांची सुनावणी वेगवेगळी घ्या, अशी मागणी शिंदे गटाच्यावतीने करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर नार्वेकर यांनी सुनावणीचे वेळापत्रक निश्चित केले आहे. ही सुनावणी नोव्हेंबरपर्यंत चालणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
0 Comments