सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी शुक्रवारीची सुट्टी जाहीर
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी दर्शविण्यात आलेली आहे.
ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
तथापि यावर्षी गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी हिंदू धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणूक काढण्यात येते व नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदू बांधवांची मोठी गर्दी जमा होत असते.
यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता व सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलाद ची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवार, दि. २८ सप्टेंबर २०२३ ऐवजी शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात येत आहे.
0 Comments