google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ..सांगोल्यात गुटखा व शिंदी विक्री जाेमात! अन्न भेसळ विभाग व पोलीसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष?

Breaking News

खळबळजनक ..सांगोल्यात गुटखा व शिंदी विक्री जाेमात! अन्न भेसळ विभाग व पोलीसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष?

खळबळजनक ..सांगोल्यात गुटखा व शिंदी विक्री जाेमात!


अन्न भेसळ विभाग व पोलीसांचे जाणूनबुजून दुर्लक्ष?

महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी सांगोला तालुक्यामध्ये मात्र उत्पादित होणारा गुटखा, सुगंधी तंबाखू, शिंदी राजरोसपणे विक्री करणारी टोळी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात व आसपासच्या जिल्ह्यातही पुरवठा करणारी सांगोला तालुक्यात कार्यरत आहे.

याला अन्न भेसळ विभाग व पोलीस यंत्रणा सहकार्य करीत असल्याचे चर्चा जनतेमधून व्यक्त केली जात आहे.

सांगोला : महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी सांगोला तालुक्यामध्ये मात्र उत्पादित होणारा गुटखा, सुगंधी तंबाखू, शिंदी राजरोसपणे विक्री करणारी टोळी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात व आसपासच्या जिल्ह्यातही पुरवठा करणारी

 सांगोला तालुक्यात कार्यरत आहे. याला अन्न भेसळ विभाग व पोलीस यंत्रणा सहकार्य करीत असल्याचे चर्चा जनतेमधून व्यक्त केली जात आहे.

ही टोळी परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची खरेदी करून सांगोल्यात साठा करून तालुक्यातील अनेक दुकानदारांना वाढीव दराने राजरोजपणे विक्री करत असल्याचे चित्र दिसत आहे. 

शासनाकडून अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या विरुध्द कठोर कारवाई करण्याचे निर्देश असूनही सांगोल्यात कोणतीही कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. 

तालुक्यातील अनेक पानपट्टीत बाहेरच्या राज्यातून येणारा गुटखा मोठ्या प्रमाणावर वितरण केला जात आहे. तालुक्यातील तरुण वर्ग व्यसनाधीन होत आहे. शाळकरी मुले ही गुटखा, माव्याच्या आहारी जात आहेत. या सर्व प्रकाराचा सुत्रधार सांगोला येथील आहे.

 ही व्यक्ती सांगोला येथून गुटखा जिल्हासह शेजारच्या जिल्ह्यात वितरीत करीत आहे. त्याच्या राहत्या घरात या अवैध मालाची साठवणूक करून शहर व ग्रामीण भागात दुचाकी व चारचाकीतून वितरीत करत आहे.

सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यात गुन्हे

या गुटखा विक्रेत्यावर सातारा, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. हा व्यवसाय सांगोला तालुक्यात आहे. त्यांच्यावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. 

यामुळे गुटखा साठवणूक करणाऱ्या व विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तालुक्यातील जनतेमधून व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments