प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “महाराष्ट्र गोमंतक सामाजिक सेवा”
पुरस्कार जाहीर मराठी अभिनेत्री मा. मेघा घाडगे यांच्या हस्ते होणार सन्मान
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
शिरभावी :- सांगोला तालुक्यातील शिरभावी गावचे सुपुत्र व श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “महाराष्ट्र गोमंतक सामाजिक सेवा” २०२३ पुरस्कार
नुकताच जाहीर झाला आहे . हा पुरस्कार जाहीर झाल्याने श्री रायगड ऐतिहासिक विश्वविद्यालयाच्या व शिरभावी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार, स्मित हरी प्रोडक्शन, मुंबई व शामरंजन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रंग साहित्य कला सामाजिक प्रेरणेचे कलानाटय एकता संमेलन, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनात देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, पत्रकारिता,साहित्य व इतर क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेऊन रंग साहित्य कला सामाजिक प्रेरणेचे कलानाटय एकता संमेलनात देण्यात
येणारा यावर्षीचा “महाराष्ट्र गोमंतक सामाजिक सेवा” २०२३ पुरस्कार प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे . शामरंजन फाउंडेशन मुंबई यांच्या निवड समितीने प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
शैक्षणिक,सामाजिक, राजकीय, पत्रकारिता, साहित्य व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठित समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती मा. प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्या कडून निवड पत्राद्वारे देण्यात आली आहे .
कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार, स्मित हरी प्रोडक्शन, मुंबई व शामरंजन फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रंग साहित्य कला सामाजिक प्रेरणेचे कलानाटय एकता संमेलन, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
रंग साहित्य कला सामाजिक प्रेरणेचे कलानाटय एकता संमेलनाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. तसेच सुप्रसिद्ध जेष्ठ अभिनेते मा. सुनिल गोडबोले, मराठी अभिनेत्री मा. मेघा घाडगे व महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलाकार मा. प्रभाकर मोरे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत
तसेच इतर प्रमुख पाहुणे या संमेलनाला लाभणार आहेत. या रंग साहित्य कला सामाजिक प्रेरणेचे कलानाटय एकता संमेलनात समाजामध्ये लोक प्रतिमा निर्माण करून ध्येय्यवादी व सामाजिक परिवर्तनाचा महामेरु निर्माण करणाऱ्या व अन्य क्षेत्रात निःस्वार्थपणे कार्य कर्तृत्व घडवून समाज
घटकांना एकत्र आणणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या संमेलनात देण्यात येणाऱ्या “महाराष्ट्र गोमंतक सामाजिक सेवा” २०२३ पुरस्कारासाठी प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची निवड करण्यात आली आहे.
या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे ही खरोखरच खूप अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे . त्यांना या संमेलनात मराठी अभिनेत्री मा. मेघा घाडगे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांची शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, पत्रकारिता व इतर क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे . या पुरस्काराचे स्वरूप
सन्मानचिन्ह, गौरवपत्र, मेडल, फेटा, श्रीफळ असे आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा वार रविवार दि. ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजता, स्थळ- पु. ल. देशपांडे कला अकादमी रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी - मुंबई या ठिकाणी पार पडणार आहे .
अशी माहिती मा. प्रा. डॉ. बी. एन. खरात यांच्याकडून देण्यात आली आहे. प्रा.डॉ.नागन्नाथ घोरपडे यांना “महाराष्ट्र गोमंतक सामाजिक सेवा” २०२३ हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे व त्यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे .
0 Comments