google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वृत्तपत्र विक्रेता व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

Breaking News

वृत्तपत्र विक्रेता व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

 वृत्तपत्र विक्रेता व त्यांच्या कुटुंबीयांसाठी वेदांत मल्टीस्पेशालिटी


हॉस्पिटल तर्फे मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

नाझरे प्रतिनिधी-(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

         ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता वृत्तपत्र विक्रेता आपली सेवा चोख बजावत असून त्यांनी कोरोना काळातही फार मोठे योगदान दिले आहे याची दखल घेऊन वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तर्फे

 सांगोला शहर व तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेता व त्यांच्या कुटुंबीयांसाठी पत्रकार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा सतीश भाऊ सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले 

असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष रविराज शेटे यांनी सांगितले.   सदर शिबिरात सीबीसी बीपी रक्तातील साखर महिलांचे हिमोग्लोबिन छातीचे पोटाचे विकार व इतर सर्व आजारावर निदान व उपचार मोफत करण्यात येणार आहेत 

तरी शहर व तालुक्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांनी या मोफत योजनेचा लाभ घेण्यासाठी शुक्रवार 29 सप्टेंबर रोजी कुटुंबासह वेदांत हॉस्पिटल सांगोला येथे हजर राहावे असे आवाहन संघटनेचे उपाध्यक्ष अमोल बोत्रे व सचिव उत्तम काका चौगुले यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments