google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व सामाजिक उपक्रमाने शांततेत पार पाडावा : सांगोला पोलीस निरीक्षक

Breaking News

सांगोला गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व सामाजिक उपक्रमाने शांततेत पार पाडावा : सांगोला पोलीस निरीक्षक

सांगोला गणेशोत्सव डॉल्बीमुक्त व सामाजिक उपक्रमाने


शांततेत पार पाडावा : सांगोला पोलीस निरीक्षक

सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी सर्वांनी पूर्वपरवानगी घेतली पाहिजे. या उत्सवाचे मंगल्य व पावित्र्य राखणे सर्व गणेश भक्तांचे आद्य कर्तव्य असून ते पावित्र्य राखले पाहिजे.

सांगोला -तालुक्यातील सर्व धर्मीयांचा सामाजिक एकोपा अतिशय चांगला आहे. हा जातीय सलोखा अबाधित ठेवून आगामी गणेशोत्सव 

धार्मिक तेढ टाळत, डॉल्बीमुक्त, सामाजिक उपक्रमांनी आनंदाने शांततेत साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले आहे.

आगामी गणेशोत्सव आणि आणि ईद-ए-मिलाद सणानिमित्त सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक

 पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये आयोजित केली होती. यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी बोलत होते. 

यावेळी बाबुराव गायकवाड, हाजी शब्बीर तांबोळी, खंडू सातपुते, अरविंद केदार, सुभाष इंगोले, बापू ठोकळे, किशोर बनसोडे, सूरज बनसोडे, तोहिद मुल्ला यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक 

आदिनाथ खरात, हेमंतकुमार काटकर, काशीद, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पोलीस पाटील उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी म्हणाले, गणेश मंडळांनी डिजे, डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा.

 ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी आवाजाची मर्यादा सर्वच मंडळांनी पाळावी. सोशल मीडियावर किंवा इतर ठिकाणी 

या उत्सवाच्या काळात कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बसवणे यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.

सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी सर्वांनी पूर्वपरवानगी घेतली पाहिजे. या उत्सवाचे मंगल्य व पावित्र्य राखणे 

सर्व गणेश भक्तांचे आद्य कर्तव्य असून ते पावित्र्य राखले पाहिजे. गणेशोत्सव मंडळांनी वृक्षारोपण, वैचारिक प्रबोधन, व्याख्यानमाला, रक्तदान, 

आरोग्य निदान शिबिर, शालोपयोगी साहित्याचे वाटप, गरजू रुग्णांना आर्थिक मदत, ग्रंथांचे वाटप आदी सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवावेत.

वाहतुकीला अडथळा न येता स्टेजची उभारणी करावी. गणेशमूर्ती समोर स्वयंसेवकांची नेमणूक करावी.

 परवानगी घेवूनच अधिकृत वीज कनेक्शन घ्यावे. समाजप्रबोधन करणारे देखावे सादर करावेत. गणेशोत्सव निर्विघ्नपणे साजरा करण्यासाठी गणेश मंडळांनी प्रयत्न करावेत. 

डॉल्बीला परवानगी नसून मंडळांनी समाजपयोगी सामाजिक कार्यक्रम राबवावेत असे आवाहन पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी केले.

यावेळी बापूसाहेब ठोकळे, अरविंद केदार, बाबुराव गायकवाड, रवी कांबळे, नागेश जोशी, शब्बीर तांबोळी, सुरज बनसोडे इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक आदिनाथ खरात यांनी केले.

Post a Comment

0 Comments