google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा.श्री. तुषार बैसाणे यांना “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” २०२३ पुरस्कार जाहीर

Breaking News

मा.श्री. तुषार बैसाणे यांना “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” २०२३ पुरस्कार जाहीर

 मा.श्री. तुषार बैसाणे यांना “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” २०२३ पुरस्कार जाहीर


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

शिरभावी :-     कवि, लेखक, व्याख्याते तथा सिनेअभिनेता  मा.श्री. तुषार बैसाणे यांना “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” २०२३ पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे . टॅलेंट कट्टा या संस्थेकडून  देण्यात येणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, साहित्य, पत्रकारिता, सहकार व इतर क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल

 घेऊन टॅलेंट कट्टा या संस्थेकडून  देण्यात येणारा चालू वर्षातील  “इंडियन टॅलेंट अवॉर्ड”  २०२३ पुरस्कार मा.श्री. तुषार बैसाणे यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे . टॅलेंट कट्टा या संस्थेच्या निवड समितीने मा.श्री. तुषार बैसाणे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. 

कला, साहित्य, व्याख्यान, व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठित समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती टॅलेंट कट्टा या संस्थेकडून निवड पत्राद्वारे देण्यात आली आहे .

                 टॅलेंट कट्टा या संस्थेकडून समाज, संस्कृती, यांचे संवर्धन व लोकशाही विचारांना एकत्र करणारा आणि जगण्याला ध्येय बनवणार्‍या ऐतिहासिक गुणवत्तेच्या सर्वश्रेष्ठ मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 

पुरस्कार प्रेरणा देतात, प्रेरणेने राष्ट्र मोठे होते ! या ब्रीदवाक्यानुसार हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे .  या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये अनेक प्रतिष्ठित

 मान्यवरांना “इंडियन टॅलेंट अवॉर्ड”  देऊन त्यांचा यथोचित सन्मान टॅलेंट कट्टा या संस्थेकडून  करण्यात येणार आहे . समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थी भावनेने  विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तिंना पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे.

 टॅलेंट कट्टा या संस्थेकडून  देण्यात येणाऱ्या “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” २०२३ पुरस्कारासाठी मा.श्री. तुषार बैसाणे यांची त्यांच्या कार्याची दखल घेऊन  निवड करण्यात आली आहे. टॅलेंट कट्टा या संस्थेकडून या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे

 ही खरोखरच खूप अभिमानाची व कौतुकास्पद बाब आहे . तसेच त्यांना या कार्यक्रमात मा.श्री. मेघराज राजेभोसले अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, सुप्रसिद्ध अभिनेत्री आर्या घारे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देऊन  गौरव करण्यात  येणार आहे .

                 मा.श्री. तुषार बैसाणे यांची कला, साहित्य, व्याख्यान  व इतर क्षेत्रातील कामगिरी पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे . मा.श्री. तुषार बैसाणे यांनी एक कवी, उत्कृष्ट लेखक, 

उत्तम व्याख्याता तसेच सिने अभिनेता या वेगवेगळ्या भूमिकेतून त्यांनी उत्तम व उत्कृष्ट कार्य केलेले आहे .  या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, गौरवपत्र,  फेटा, श्रीफळ असे आहे. 

सदर पुरस्कार वितरण सोहळा वार रविवार दि. 8 ऑक्टोंबर, 2023 रोजी सकाळी 10.00 ते 1.00 या वेळेत स्थळ : पत्रकार भवन सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे या ठिकाणी पार पडणार आहे . अशी माहिती टॅलेंट कट्टा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दिपक जाधव यांच्याकडून देण्यात आली आहे. 

मा.श्री. तुषार बैसाणे यांना “इंडियन टॅलेंट अवॉर्ड” २०२३ हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांना कुटुंबियांकडून, ग्रामस्थांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत व इतर  सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे व त्यांच्या वरती अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे .

Post a Comment

0 Comments