रामोशी, बेरड समाजाला न्याय देणा-या देवेंद्र फडणवीस यांचे आभार
मानण्यासाठी " धन्यवाद देवेंद्रजी " यात्रेचे आयोजन ; दौलतनाना शितोळे
सांगोला प्रतिनिधी ; राज्य सरकारकडून विविध समाजासाठी ४ आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करण्यात आली आहे. त्यापैकी इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाची भूमिका पार पडणाऱ्या
"आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक " यांच्या नावाने महाराष्ट्र राज्यातील तमाम रामोशी , बेरड समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन राज्य सरकारने लढवय्या समाजाला योग्य न्याय दिला आहे.
आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून जय मल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील समस्त रामोशी , बेरड समाजाच्या वतीने सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली धन्यवाद देवेंद्रजी,धन्यवाद बीजीपी
हि यात्रा आयोजित करण्यात आली आहे. धन्यवाद देवेंद्रजी,धन्यवाद बीजीपी हा कार्यक्रम सांगोला शहरातील महुरोड वरील गणेश मंदिर मंगल कार्यालयात दि.२१ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले चौकातून सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून
महात्मा फुले चौक ते गणेश मंदिर मंगल कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला उपस्थित असणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे व कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. बाबासाहेब देशमुख यांची महात्मा फुले चौक ते गणेश मंदिर अशी घोड्यावरुन मिरवणूक काढण्यात आली.
या पदयात्रेस हजारोंच्या संख्येने रामोशी ,बेरड समाजातील महिला , पुरुष उपस्थित होते. धन्यवाद देवेंद्रजी,धन्यवाद बीजीपी हा कार्यक्रम सांगोला शहरातील महुरोड वरील गणेश मंदिर मंगल कार्यालयात जय मल्हार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे साहेब यांच्या
अध्यक्षतेखाली,उदघाटक पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी,जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अंकुशरावजी जाधव (सर), राज्याचे युवक अध्यक्ष सुधीरदादा नाईक,जिल्हा अध्यक्ष उमेशभाऊ मंडले,युवक अध्यक्ष दताभाऊ चव्हाण,
, माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने,
होलार समाजाचे नेते शिवाजीराव जावीर,आरपीआयचे तालुका अध्यक्ष खंडू तात्या सातपुते,शेकापचे नेते शिवाजी शेजाळ,माजी सरपंच सिद्राम बोडरे तालुका अध्यक्ष संतोषभाऊ चव्हाण,
तालुका उपाध्यक्ष दिपकभाऊ चव्हाण,तालुका प्रसिद्धी प्रमुख गणेश चव्हाण,प्रशांत जाधव,शहाजी चव्हाण,शिवाजी चव्हाण ,मधुकर चव्हाण सर ,नवनाथ भाऊ मसुगडे,सोमनाथ चव्हाण,बाळासाहेब जाधव
,बापूराव चव्हाण,अनिल गुजले,बळीराम बोडरे,संभाजी चव्हाण,संभाजीमामा गुजले,सुरेश परसे,रघुनाथ गुजले,दीपक टोकले,तुकाराम चव्हाण,बापू मलमे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजातील महिला पुरुष सहभागी झाले होते.
0 Comments