कै.आ.डॉ. गणपतरावजी देशमुख यांचा शैक्षणिक वारसा आपण सर्वांनी पुढे न्यायचा आहे.
मा.श्री. विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा
सांगोला/प्रतिनिधी- २३ सप्टेंबर रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोल्याचा ३२ वा वर्धापन दिन व कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३६ वी जयंती सोहळा महाविद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रम प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपविभागीय पोलीस अधिकारी मंगळवेढा मा.श्री. विक्रांत गायकवाड यांनी असे सांगितले
की कै.आ.डॉ. गणपतरावजी देशमुख यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून जो वारसा तयार केलेला आहे तो वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे.
तसेच आपण सर्वांनी सर्वांगीण विकास साधायचा असेल तर शिक्षण हा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्रवेश द्वाराचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर मुख्य कार्यक्रम मल्टीपर्पज हॉल येथे संपन्न झाला. मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै.आ.डॉ. गणपतरावजी देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी केले. प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी महाविद्यालयाने २३ सप्टेंबर १९९१ पासून केलेल्या प्रगतीचा आढावा थोडक्यात घेतला.
प्राचार्य यांच्या मनोगतानंतर संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे सर यांनी आपल्या मनोगतात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाज्यातील मुलांच्या शिक्षणासाठी केलेला त्याग याचे वर्णन केले.
प्रमुख पाहुण्यांच्या मनोगतानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य मा. डॉ. अनिकेत भैया देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि शिक्षणामुळे माणसाची आकलन क्षमता वाढते व आकलन क्षमतेमुळे यशस्वी होण्याचा टक्का वाढत जातो.
शिक्षण शिकून यश मिळवायचे असेल तर मन घट्ट करून कठोर परिश्रम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास संस्थेचे जेष्ट संचालक मा. बबनराव जानकर, संस्था सदस्य मा.डॉ. अशोकराव शिंदे, संस्था सदस्य मा. दिपकराव खटकाळे, संस्था सदस्य मा. जयंत जानकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन न्यू इंग्लिश स्कूल, ज्यू. कॉलेजचे प्राचार्य प्रा.हेमंतकुमार आदलिंगे यांनी केले. व कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. डॉ. किसनराव माने, प्रा. अशोक कांबळे व प्रा. डॉ. सौ. शितल शिंदे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनोजकुमार माने व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय स्टाफ, चतुर्थश्रेणी कर्मचारी व अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी विशेष परिश्रम घेतले होते.
0 Comments