डोंगरगाव ता.सांगोला येथील जळीतग्रस्त कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मोठा दिलासा....
आठ दिवसात घर उभा करून देण्याचा संकल्प- मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
डोंगरगाव ता.सांगोला येथे सोमवार दिनांक 18/09/2023 रोजी श्री.रमेश महादेव पाटील यांच्या राहत्या घराला अचानक आग लागल्याने या आगीत त्यांचा संपूर्ण संसार जळून खाक झाला.
अक्षरशः मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करणारे हे पाटील कुटुंबीय या धक्क्याने रस्त्यावर आले. संपूर्ण सांगोला तालुका या घटनेने हळहळला. ही घटना गोरगरिबांची जाण असलेला,
वंचिताचा तारणहार व संकटमोचक असलेला लोकनेता मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आज डोंगरगावातील गावकऱ्यांच्या समवेत या घटनास्थळी भेट देऊन त्या कुटुंबाची झालेली दयनीय अवस्था पाहून तात्काळ
आठ दिवसांमध्ये या कुटुंबाला नवीन घर बांधून देऊन निवारा करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. यामध्ये सांगोला शहर राष्ट्रवादी कडून संपूर्ण घराला लागणाऱ्या विटा, डोंगरगाव राष्ट्रवादीकडून दरवाजे व खिडक्या,
सोनंद राष्ट्रवादीकडून संपूर्ण घराला लागणारे सिमेंट,आणि बांधकामाची व्यवस्था कडलास राष्ट्रवादी काँग्रेस कडून करून येत्या आठ दिवसांमध्ये जळीतग्रस्त कुटुंबाचे नव्या घरात स्थलांतरित करण्याचे आदेश मा.आबांनी कार्यकर्त्यांना दिले.
या आबांच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा गोरगरीब,वंचित व संकटांमध्ये सापडलेल्या तालुक्यातील जनतेचा एकच आधार फक्त आणि फक्त दिपकआबा साळुंखे पाटील हेच आहेत हे सिद्ध झाले. या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
0 Comments