google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक ...पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे वृद्ध महिलेचा खून

Breaking News

खळबळजनक ...पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे वृद्ध महिलेचा खून

खळबळजनक ...पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथे वृद्ध महिलेचा खून


वाखरी (ता.पंढरपूर) येथे एका वृद्ध महिलेचा अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तीकडून खून झाल्याचे आज (दि.६) उघडकीस आले. या घटनेमुळे वाखरी परिसरात खळबळ उडाली आहे.मालन किसन ढाळे (वय 65) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, वाखरी येथील गोसावी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे असलेल्या होरणे यांच्या शेतामध्ये मालन किसन ढाळे यांचा मृतदेह आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आढळून आला.

 या घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील बाळासाहेब शेंडे यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यास माहिती दिली.

यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, पोलीस निरीक्षक भुजबळ यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. मालन ढाळे यांच्या मानेवर, डोक्यावर व डोळ्याच्या बाजूला धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसून येत आहे.

 त्यांचा खून कोणी केला, व कोणत्या कारणासाठी केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी पंचनामा केलेला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह सामान्य रुग्णालय येथे आणला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments