ब्रेकिंग न्यूज! तुम मुस्लिम हो, हिंदू जैसे क्यू हरकते करते हो मांत्रिकाच्या
सांगण्यावरून अंधश्रद्धेपोटी दोन वेळा गर्भपात सोलापूरातील घटना...
सोलापूर (प्रतिनिधी) मांत्रिकाच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेपोटी दोन वेळा गर्भपात केल्याप्रकरणी २४ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ५ मार्च २०२२ रोजी शोभादेवी नगर नई जिंदगी येथे घडली. याप्रकरणी आदम रियाज शेख (वय-२९,रा.वाकड हिंजवडी रोड
भुजबळ वस्ती पुणे) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून फिर्यादी यांचे सासरे रफिक इमामसाब फुलमाडी, सासू शबाना रफिक फुलमाडी, मेव्हणा सद्दाम रफिक फुलमाडी व फिर्यादी यांची पत्नी शाईन आदम
शेख (सर्व.रा.विजयनगर,कुमठा नाका, सध्या - व्हिजन ९ मॉल च्या मागे लेबर कॅम्प पिपळे सौदागर,पुणे) यांच्यासह २० जणांविरुद्ध तब्बल १७ महिन्यानंतर (दि.५ सप्टेंबर २०२३) गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी
की, वरील संशयित आरोपी सासरे, सासू, मेव्हणा व पत्नी असे नातलग असून फिर्यादी यांची पत्नी शाईन या फिर्यादीकडे नांदत असताना त्यांचा दोन वेळा तीन महिन्याचे गरोदर असताना फिर्यादी यांचे सासरे, सासू व मेव्हणा यांनी
कोणत्यातरी मांत्रिकाच्या सांगण्यावरून अंधश्रद्धेपोटी दोन वेळा गर्भपात केला. याबाबत फिर्यादी यांनी विचारणा केली असता या घटनेविषयी वाद सुरू होता. दि.५ मार्च २०२२ रोजी याबाबत शोभादेवी नगर येथील शाईन यांच्या आजोबांच्या घरी बैठक ठरली होती.
त्यानुसार फिर्यादी, फिर्यादी यांचे आई-वडील, बहीण, भावजी व इतर ८ लोक असे मिळून आले होते. त्यावेळी वरील संशयित आरोपी व इतर ३० ते ३५ लोक हजर होते. त्यावर तेथे असलेल्या मौलाना याने फिर्यादीस तुम नमाज पडते क्या असे म्हणत तुम मुस्लिम हो, हिंदू जैसे क्यू हरकते करते हो,
असे म्हणाल्यावर फिर्यादी यांचा मेहुना सद्दाम फुलमाडी याने फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. त्यावेळी फिर्यादी यांनी मुझे बताओ मेरी बीबी का दो बार क्यू गर्भपात किया,मेरे बच्चे को क्यू मारा. यावर फिर्यादी यांचे सासरे रफिक यांनी दरवाज्याला कडी लावण्यास सांगितले. तुम्हारे को आज जिंदा नही छोडेगे असे म्हणून वरील संशयित आरोपी यांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. तसेच त्यावेळी फिर्यादी यांचे वडील बेशुद्ध पडले. त्यानंतर फिर्यादी यांची आई रुकसाना यांनी फिर्यादीस सांगितले की, त्यांच्या गळ्यातील अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र सद्दाम याने इसका मारून ओढून घेतले आहे व फिर्यादीचे सहा तोळ्याचे चांदीची चैन व खिशातील पाकीट,रोख रक्कम,एटीएम कार्ड,मतदान कार्ड व इतर कागदपत्रे काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे हे करीत आहेत.


0 Comments