श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी वाणिज्य व अर्थशास्त्र विभागच्या संयुक्त
विद्यमाने डिजिटल पेमेंट व सायबर सेक्युरिटी अवेअरनेस या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन संपन्न..
श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी वाणिज्य व अर्थशास्त्र विभागच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल पेमेंट व सायबर सेक्युरिटी अवेअरनेस या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यशाळेत 112 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. किशोर जाधव यांनी केले तसेच कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. ऋतुजा कुलकर्णी यांनी केले.
या कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. नेताजी दबडे रिसर्च फेलो वाणिज्य व व्यवस्थापन विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे होते.
त्यांनी याप्रसंगी त्यांनी कॅशलेस पेमेंट यावर माहिती दिली. तसेच कॅशलेस पेमेंटचा परिचय करून दिला. कॅशलेस पेमेंट चे फायदे काय आहेत हे विद्यार्थ्यांना परिचय करून दिला.
कॅशलेस पेमेंटच्या आणि प्रकार यावर प्रकाश टाकला. डिजिटल वॅलेट याबाबत सविस्तर माहिती दिली. युएसआयडी हे वापरावे हे सांगितले.
दुसऱ्या सत्रामध्ये सायबर सुरक्षा या विषयावर माहिती दिली सध्याच्या काळात सायबर सुरक्षा का महत्त्वाची आहे या विषयावर सविस्तर माहिती दिली सायबर सुरक्षेचे प्रकार सांगितले
सायबर हल्ल्यापासून आपले संरक्षण कसे करावे हे अवगत केले सायबर डोम परियोजना काय आहे ही याच्याबद्दल माहिती दिली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव भोसले होते त्यांनी कॅशलेस अर्थव्यवस्थेची आव्हाने काय आहेत बाबत माहिती दिली
तसेच कॅशलेस इंडिया म्हणजे काय कॅशलेस पेमेंट चे फायदे कोणते व तोटे कोणते याबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले. या कार्यशाळेचे आयोजन डॉ. किशोर जाधव वाणिज्य विभाग प्रमुख व डॉ. ऋतुजा कुलकर्णी अर्थशास्त्र विभाग प्रमुख व प्रा.प्रसाद माळी यांनी केले


0 Comments