सांगोला शहरात गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त;
टाकलेला मुरुम गेला वाहून सांगोल्यात मिरवणुकीला खड्डयांचा अडथळा
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३७८१२)
सांगोला, सांगोला शहर व तालुक्यातील गणपती विसर्जनासाठी सर्वच प्रशासकीय विभागांनी जय्यत तयारी केली आहे. शहर व तालुक्यातील परवानगी घेतलेल्या १३७ मंडळांच्या विसर्जन मिरवणूका आहेत.
विसर्जन मिरवणुकीसाठी ९ पोलिस अधिकारी व १३० पोलिस कर्मचारी, होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.
गणपती आगमनाच्या अगोदरच नगरपालिकेने रस्त्यावर खड्डे बुजवण्याचे काम केले. रस्त्यांवर मातीमिश्रित मुरूम टाकला मात्र पावसामुळे माती मिश्रित मुरूम वाहून गेला आहे. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत.विधिमंडळानी समाजउपयोगी
गणेश आगमनानंतर तालुक्यात विविध कार्यक्रम राबविले, गेल्यादहा दिवसापासून सुरू असणान्या गणेशोत्सवाची धामधूम विसर्जन मिरवणुकीनंतर संपणार आहे. मंडळांनीलेझीम, ढोल ताशा, पारंपरिक वाद्यांचा वापर करून मोठ्या उत्साहात विसर्जन करण्याची तयारी गेली दोन-तीन दिवस झाले सुरू केली आहे.
या मिरवणुकीमध्ये सांगोला तालुक्यातील परवानगी शहरासहठेवण्यात येणार आहे. प्रमुख
घेतलेल्या १३७ मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त मंडळांच्या विसर्जन मार्गाची पाहणी, गणेश विसर्जन करण्यात येणाऱ्या ठिकाणाची पाहणी करण्यात आलीआहे. तसेच या कालावधीमध्ये लाइट जाणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली आहे.
अनेक मंडळांच्या गणेशाच्या उंच मूर्तीमुळे रस्त्यावर अडथळा येणार नाही याची काळजीही घेतली आहे. १३७ परवानगी घेतलेल्या मंडळांसह इतर अनेक छोटी मोठी मंडळेही उद्या आपल्या गणेशाचे विसर्जन करणार आहेत.
त्यामुळे शहर व तालुक्यात विभागवार नऊ अधिकाऱ्यांचे तसेच एकूण १३० पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांची विभागणी करण्यात आली असून कोठेही अनुसूचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे.
पारंपरिक वाद्यांनाच मंडळांचे प्राधान्य
या गणेश आगमनाअगोदरपासूनच डॉल्बीला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अनेक गणेश मंडळांनी या विसर्जन मिरवणुकीसाठी लेझीम, ढोल, ताशा विविध प्रकारची पारंपरिक वाद्य यांना आपल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळांनी प्राधान्य दिले आहे.
परंतु एकाच दिवशी अनेक मिरवणूक असल्यामुळे अशी वाद्य वाजवणारे अपुरे पडल्याची ही यावेळी दिसून आले. गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीमुळे प्रमुख रस्त्यांवरील वातावरण ही उद्या मंगलमय होणार आहे.
0 Comments