google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शासकीय मदतीशिवाय सूतगिरण्या चालवणे अशक्य : डॉ. प्रभाकर माळी डॉ. गणपतराव देशमुख सूतगिरणी वार्षिक सभा

Breaking News

सांगोला शासकीय मदतीशिवाय सूतगिरण्या चालवणे अशक्य : डॉ. प्रभाकर माळी डॉ. गणपतराव देशमुख सूतगिरणी वार्षिक सभा

 सांगोला शासकीय मदतीशिवाय सूतगिरण्या चालवणे अशक्य : डॉ. प्रभाकर माळी डॉ. गणपतराव देशमुख सूतगिरणी वार्षिक सभा


(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला, ता. २७ सहकारी सूतगिरण्या चालल्या पाहिजेत, ही भूमिका केंद्र व राज्य शासनाने घेतल्याशिवाय तसेच सहकारी सूत गिरण्यांना आर्थिक मदत केल्याशिवाय

 हा उद्योग यापुढील काळात तग धरु शकणार नाही. सध्या सूतगिरणी चालवणे जिकिरीचे झाले आहे. सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहून सर्व 

संचालक मंडळ सूतगिरणी चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन, सूत गिरणीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी यांनी दिले.

डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणीची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सूतगिरणी कार्यस्थळावर घेण्यात आली. या वार्षिक समेत सूतगिरणीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर माळी बोलत होते.

या सभेसाठी रतनकाकी देशमुख, उपाध्यक्ष नितीन गव्हाणे, माजी चेअरमन प्रा. नानासाहेब लिगाडे, शेकापचे तालुका चिटणीस दादा बाबर, विठ्ठलराव शिंदे, रमेश जाधव, अरूण पाटील, 

माजी सभापती बाळासाहेब काटकर, मारुती बनकर, नवनाथ पवार, सुरेश माळी, किशोर बनसोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. सचिन देशमुख, संगम धांडोरे, लक्ष्मण माळी, गोविंद माळी,

 भारत माळी, शहाजी नलवडे, अवधुत कुमठेकर, रामचंद्र लवटे, सुनील चौगुले,अॅड. विशालदिप बाबर, उषा लोखंडे, कल्पना शिंगाडे, प्रतिभा माळी, उपा देशमुख, कौसल्या शिंदे, संजय शिंगाडे,

 बापू ठोकळे आदी मान्यवर तसेच संस्थेचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, कामगार व सभासद उपस्थित होते.

डॉ. प्रभाकर माळी यांनी संस्थेच्या कामकाजाचा आढावा सभेपुढे सादर केला. सहकारी सूत गिरण्या उभारणीचे राज्य शासनाचे धोरण व वाटचाल याची सभेत माहिती देऊन मागील ६-७ वर्षापासून

 वस्त्रोद्योगात निर्माण झालेली अनिश्चितता, राज्य व केंद्र सरकारचे वस्त्रोद्योग बाबतचे धोरण, सध्याची या उद्योगाची परिस्थिती याची माहिती सभेत दिली.

 सहकारी सूतगिरण्या चालल्या पाहिजेत ही भूमिका केंद्र व राज्य शासनाने घेतल्याशिवाय तसेच डॉ. प्रभाकर माळी यांनी प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कामकाजाचा आढावा सभेपुढे सादर केला

सूतगिरणीस पाच कोटींचा तोटा

२०२२-२३ या अहवाल सालात डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूत गिरणीला सुमारे ४ कोटी ८६ लाख २२ लाख रोकड तोटा झाला आहे. एकूण ६ कोटी २२ लाख ७६ हजार रुपयांचा तोटा झाला आहे.

Post a Comment

0 Comments